ShaniDev: सोसणार नाही साडेसातीचा दणका! या राशीच्या लोकांवर आता संकटाचे ढग दाटू लागलेत, अलर्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: एखाद्या ज्योतिषानं सांगितलं की साडेसाती सुरू आहे. तर हा शब्द ऐकल्यावरच अनेकांच्या मनात भीती वाटते. सर्वसाधारणपण साडेसातीला लोक घाबरतात. पण तो फक्त संकटांचा काळ असतोच असं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, हा एक महत्त्वाचा आणि परिवर्तनशील काळ मानला जातो. साडेसातीमध्ये अनेकांना सत्य परिस्थिती लक्षात येते, माणूस भ्रमातून बाहेर येतो, योग्य-अयोग्य काय याचा अर्थ लागतो.
advertisement
1/7

शनि ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी साधारणपणे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे, तीन राशींतून प्रवास करण्यासाठी त्याला एकूण साडेसात वर्षे लागतात. या साडेसात वर्षांच्या काळाला साडेसाती म्हणतात.
advertisement
2/7
साडेसातीचा काळ हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला असतो, आणि प्रत्येक टप्प्याचा प्रभाव वेगळा असतो. या वर्षी मेष राशीला साडेसाती लागली आहे. मेष राशीवर साडेसातीचा दुसरा म्हणजेच अवघड टप्पा हा 03 जून 2027 पासून सुरू होईल. या काळात शनी मेष राशीत प्रवेश करेल.
advertisement
3/7
पहिला टप्पा (चढती साडेसाती): हा टप्पा 29 मार्च 2025 पासून सुरू झाला आहे, जेव्हा शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे. या काळात मेष राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू झाली. साडेसातीचा दुसरा टप्पा हा सर्वात कठीण आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो, तो 3 जून 2027 रोजी सुरू होईल. शनीचा मेष राशीत प्रवेश झाल्याने या टप्प्यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर अनेक अडचणी येऊ शकतात.
advertisement
4/7
तिसरा टप्पा हा उतरती साडेसाती मानला जातो हा टप्पा 8 ऑगस्ट 2029 पासून सुरू होईल. या काळात साडेसातीचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो.
advertisement
5/7
साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात, ज्यात शनिदेवाच्या मंत्राचा जप, हनुमान चालिसाचे पठण, शनिवारी शनि मंदिरात जाऊन पूजा करणे आणि दानधर्म करणे इत्यादींचा समावेश असतो
advertisement
6/7
शनि हा न्याय आणि कर्माचा ग्रह मानला जातो. साडेसातीमध्ये तो व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतो. जर तुम्ही प्रामाणिक, मेहनती आणि चांगले कर्म केले असतील, तर तुम्हाला संघर्षानंतर यश मिळते.
advertisement
7/7
हा काळ व्यक्तीला संयम, सहनशीलता आणि कठोर परिश्रम शिकवतो. अनेक लोक या काळात जीवनातील वास्तवाची ओळख करून घेतात आणि अधिक परिपक्व बनतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: सोसणार नाही साडेसातीचा दणका! या राशीच्या लोकांवर आता संकटाचे ढग दाटू लागलेत, अलर्ट