'हो... मी डेट करतेय', 'आई कुठे काय करते' फेम 'संजना'ला मिळाला पार्टनर, सर्वांसमोरच जाहीर केलं प्रेम, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rupali Bhosale Relationship Status : लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसलेने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही असे खुलासे केले आहेत, जे ऐकून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.
advertisement
1/10

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या कामामुळे खूप चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/10
आता तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही असे खुलासे केले आहेत, जे ऐकून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.
advertisement
3/10
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा रुपालीला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने कोणताही आडपडदा न ठेवता उत्तर दिलं. ती म्हणाली, “हो… मी डेट करत आहे… मी रिलेशनशिपमध्ये आहे.”
advertisement
4/10
त्यानंतर तिला ‘तू लग्न कधी आणि कोणाशी करणार?’ असं विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर खूपच मजेशीर आणि हटके होतं.
advertisement
5/10
ती म्हणाली, “माझं लग्न झालंय. मी स्वतःशीच लग्न केलंय.” तिच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू आलं. पण त्यानंतर तिने लग्नाबद्दल तिची खरी भूमिका स्पष्ट केली.
advertisement
6/10
रुपाली म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात नक्कीच पुढे जायचं आहे, पण जोपर्यंत माझ्या भावाचं सगळं मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी लग्नाचा विचार करू शकत नाही.”
advertisement
7/10
रुपालीने सांगितलं की, सध्या ती तिच्या आई-वडिलांना आणि भावाला सांभाळत आहे. जोपर्यंत तिचा भाऊ लग्न करून सेटल होत नाही, तोपर्यंत ती स्वतःच्या लग्नाचा विचार करणार नाही.
advertisement
8/10
ती म्हणते, “तोपर्यंत माझ्या डोक्यात सतत त्याचेच विचार येत राहतील. मग मी जिथे असेन, तिथे ना ती माणसं आनंदी राहणार ना मी.”
advertisement
9/10
रुपाली पुढे म्हणाली की, “जो कोणी माझ्या आयुष्यात येईल, त्याला माझं कुटुंब त्याचीही जबाबदारी वाटली पाहिजे. आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांची जबाबदारी माझी आहे. उद्या संकेत म्हणाला की, आम्ही वेगळे राहतोय, तरी मला काहीच प्रॉब्लेम नसेल. तो सुखी राहणं महत्त्वाचं आहे.”
advertisement
10/10
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर रुपाली त्याच वाहिनीवरच्या ‘लपंडाव’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती ‘सरकार’ची भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हो... मी डेट करतेय', 'आई कुठे काय करते' फेम 'संजना'ला मिळाला पार्टनर, सर्वांसमोरच जाहीर केलं प्रेम, म्हणाली...