रुपाली भोसलेने दहावीही पूर्ण केली नाही, काय आहे अभिनेत्रीचं शिक्षण? सांगितलं शाळा सोडण्याचं खरं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rupali Bhosale Education : आपल्या दमदार अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने दहावीपर्यंतही शिक्षण पूर्ण केलं नाहीये.
advertisement
1/6

मुंबई: आपल्या दमदार अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपाली 'लपंडाव' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
advertisement
2/6
पण, तुम्हाला माहिती आहे का, या लोकप्रिय अभिनेत्रीने दहावीपर्यंतही शिक्षण पूर्ण केलं नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने स्वतःच हा खुलासा केला आहे.
advertisement
3/6
रुपाली भोसलेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यात तिने तिच्या शिक्षणाबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. ती म्हणाली, “मी नववी शिकलेली मुलगी आहे. तेव्हा आमची परिस्थिती अशी नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की, माझ्या भावाने म्हणजेच संकेतने शिकावं.”
advertisement
4/6
रुपाली पुढे म्हणाली, “आमच्या डोक्यात हाच विचार होता की, उद्या आई-वडिलांनंतर घर सांभाळण्याची जबाबदारी संकेतवर येणार आहे. त्यामुळे त्याने शिकणं खूप गरजेचं होतं. मुलीचं काय, लग्न होणार आणि ती नवऱ्याच्या घरी जाणार, नवरा सगळं बघेल, अशी विचार करण्याची पद्धत तेव्हा होती. लहान असताना तेव्हा काहीच समजत नव्हतं.”
advertisement
5/6
आजही तिला ४० पानांची स्क्रिप्ट दिली, तर ती कुठेही न थांबता पाठ करू शकते, असं रुपालीने सांगितलं. ती म्हणाली, “शिक्षण महत्त्वाचं आहे, पण माझ्या आयुष्यात मला कुठेच काही कमी वाटत नाही. मी आज इतक्या मोठ्या लोकांसोबत उठते-बसते. मी जोपर्यंत त्यांना सांगत नाही, तोपर्यंत त्यांना कळत नाही की मी फक्त नववी पास आहे.”
advertisement
6/6
रुपालीने हेही सांगितलं की, तिला जेव्हा असं वाटेल की तिच्यात काहीतरी कमी आहे, तेव्हा तिचा आत्मविश्वास कमी होईल. म्हणून ती त्या गोष्टींकडे बघतच नाही, उलट तिच्यात काय चांगलं आहे, यावर ती लक्ष देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रुपाली भोसलेने दहावीही पूर्ण केली नाही, काय आहे अभिनेत्रीचं शिक्षण? सांगितलं शाळा सोडण्याचं खरं कारण