Marathi Actress : प्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षांनी करतेय TV वर कमबॅक, रुपाली भोसलेला देणार काँटे की टक्कर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress Come Back : आई कुठे काय करते मालिकेनंतर रुपाली भोसले आणि लंपडाव मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारतेय. रुपालीला टक्कर देण्यासाठी एक प्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षांनी कमबॅक करतेय. ती देखील लेडी व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
1/9

मराठी टेलिव्हिजनवर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. या मालिकेत अनेक अभिनेत्री नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
advertisement
2/9
अशीच एक अभिनेत्री तब्बल10 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. अभिनेत्रीची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
advertisement
3/9
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली हळद रुसली कुंकू हसलं मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता नशिबवान आणि लपंडाव या नव्याकोऱ्या मालिकांच्या प्रोमोने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
4/9
नशिबवान मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास 10 वर्षांनंतर त्या पुन्हा मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज आहेत.
advertisement
5/9
याआधी स्टार प्रवाहच्या बे दुणे दहा मालिकेत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली होती. नशिबवान मालिकेच्या निमित्ताने त्या पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहेत.
advertisement
6/9
उर्वशी असं सोनालीच्या पात्राचं नाव आहे. दिसायला अतिशय सुंदर मात्र रुपाचा प्रचंड असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.
advertisement
7/9
उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाली, "स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे आवडतं माध्यम आहे."
advertisement
8/9
"नशिबवान मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. खूप उत्सुकता आहे."
advertisement
9/9
"चित्रपट, वेबसीरिज, माझी निर्मिती संस्था यात प्रचंड व्यस्त होते. मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती. या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुध्द आहे त्यामुळे कस लागतोय."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : प्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षांनी करतेय TV वर कमबॅक, रुपाली भोसलेला देणार काँटे की टक्कर