TRENDING:

Priya Marathe : 'प्रियाला भेटायला जायचं होतं पण...' शेवटची आठवण सांगत उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

Last Updated:
Usha Nadkarni on Priya Marathe Death : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी प्रियाच्या निधनावर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. प्रियाच्या निधनाची बातमीच ऐकताच उषा यांना अश्रू अनावर झालेत.
advertisement
1/8
'प्रियाला भेटायला जायचं होतं पण...' शेवटची आठवण सांगत उषा ताईंना अश्रू अनावर
P प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी निधन झालं. प्रियाला कॅन्सर झाला होता. तिच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टी पुरती हादरली आहे.
advertisement
2/8
अनेक मराठी कलाकारांनी तिच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकरणी यांना प्रियाच्या निधनाची बातमी समजताच त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/8
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, "मला फार वाईट वाटलं. मी अंकिताला भेटले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, प्रिया भेटायला जायचं."
advertisement
4/8
"पण अंकिता मला म्हणाली, शंतनू म्हणतो येऊ नका. तिला भेटायची परिस्थिती नाही. म्हणजे त्यावेळी केस वगैरे गळत असतील."
advertisement
5/8
"तरी देखील मी म्हटलं होतं आपण तरीही तिला भेटायला जाऊया. पण वाटलं नव्हतं. ती इतक्या लवकर आमच्यातून जाईल. असं व्हायला नको होतं."
advertisement
6/8
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, "देव का असं करतो मला काही कळत नाही. त्या पोरीने आताच संसार उभा केला होता. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.. तिचं जायचं वय नव्हतं."
advertisement
7/8
"प्रिया खूप शांत स्वभावाची होती. सर्वांबरोबर मिळून -मिसळून राहायची. देवाने हे काय केलं. आमच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांच्या मृत्यूबद्दल ऐकून वाईट वाटतं. आधी सुशांत गेला आता प्रिया. खूप कमी वयात गेली. तिचं वय नव्हतं जायचं."
advertisement
8/8
प्रिया मराठे आणि उषा नाडकर्णी यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिका संपल्यानंतरही अनेक वर्ष त्या एकमेकींच्या संपर्कात होत्या. प्रियाच्या जाण्याने उषा नाडकर्णी यांनी खूप मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe : 'प्रियाला भेटायला जायचं होतं पण...' शेवटची आठवण सांगत उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल