5 सवयी आताच सोडा, नाहीतर म्हातारपणी स्वतःला कोसाल, उठता-बसता होईल त्रास!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Healthy habits: खूप शिकायचंय, चांगल्या पगाराची नोकरी मिळवायचीये, मनासारखं काम करायचंय, जगावेगळं काहीतरी करायचंय, आवडत्या व्यक्तीसोबतच लग्न करायचं, असं हे सध्याचं स्पर्धात्मक युग. इथं सगळंकाही इन्स्टंट हवं असतं. मात्र या इन्स्टंटच्या नादात आपण सर्वात आवश्यक गोष्टीकडे कळत-नकळतपणे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आपलं आरोग्य. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
advertisement
1/5

आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात, आरोग्य सुदृढ हवं असेल तर काही सवयी सोडणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी जंक फूडपासून दूर राहा. यामुळे आरोग्याचं सर्वाधिक नुकसान होतं. यातून पोषक तत्त्व मिळत नाहीतच पण झाला तर त्रासच होतो, शिवाय पोटही गच्च होतं.
advertisement
2/5
अनेकजणांच्या झोपण्या, उठण्याला काही काळवेळ नसतो. यामुळे वजन वाढतं, ताण वाढतो. म्हणूनच ही सवय सोडा आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.
advertisement
3/5
'पाणी हे जीवन आहे', असं म्हणतात ते काही विनाकारण नाही. जेवढं जास्त पाणी शरिरात जातं, तेवढंच शरीर स्वच्छ राहतं. त्यामुळे आपल्या वयाप्रमाणे दिवसभरातून पुरेसं पाणी शरिरात जायलाच हवं. अनेकजण 1 ग्लास पाणी पितात आणि त्यावर पूर्ण दिवस काढतात. असं करणं धोक्याचं आहे. यामुळे किडनीपासून मेंदूपर्यंत शरीर डॅमेज होऊ शकतं.
advertisement
4/5
रात्री उशिरा 2-3 वाजेपर्यंत जागं राहणं अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे विविध मानसिक आणि शारीरिक आजार जडू शकतात. 10 ही रात्री झोपण्याची योग्य वेळ आहे. त्यामुळे स्ट्रेस, एंजायटी आणि हाय बीपीसारखे त्रास होत नाहीत.
advertisement
5/5
<a href="https://news18marathi.com/lifestyle/surya-namaskar-day-2024-good-for-mental-and-physical-health-surya-namaskar-benefits-in-marathi-mhpp-1127596.html">व्यायाम</a> न करणं म्हणजे आजारपणाला आमंत्रण देणं. शरिराला दररोज किमान अर्धा तास व्यायाम हवाच. आपल्याला फार काही शक्य नसेल तर निदान धावावं किंवा चालावं. परंतु शरिराची हालचाल होणं गरजेचं आहे, ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि <a href="https://news18marathi.com/lifestyle/right-way-to-check-blood-pressure-should-we-check-blood-pressure-while-sitting-or-lying-down-mhpj-1173445.html">बीपी</a>, <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/natural-home-remedies-for-diabetes-l18w-mhij-local18-1231313.html">शुगर</a>सारखे त्रास कंट्रोलमध्ये राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
5 सवयी आताच सोडा, नाहीतर म्हातारपणी स्वतःला कोसाल, उठता-बसता होईल त्रास!