TRENDING:

mutton : मटण खाल्ल्यामुळे खरंच मुळव्याध होतो का? तुमच्या प्रश्नाचं सोप्पं उत्तर

Last Updated:
सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पाइल्स म्हणजेच मूळव्याधीची समस्या वाढत आहे. मूळव्याधच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून त्याला विविध कारण आहेत. मटण खाल्लयाने मूळव्याध होतो असे देखील काहीजण म्हणतात, पण त्यात कितपत तथ्य आहे याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5
mutton : मटण खाल्ल्यामुळे खरंच मुळव्याध होतो का? तुमच्या प्रश्नाचं सोप्पं उत्तर
कोरा या साईटवर चिकन, मटण यामुळे मूळव्याध असणाऱ्या लोकांना जास्त त्रास होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रियांका धागे या महिलेने उत्तर देताना म्हंटले की, " चिकन मटण बनवताना त्यात खुप सारे मसाले वापरले जातात. ते मसाले उष्ण असतात त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत असताना आपण प्रक्रिया केलेले मांस, लाल मांस आणि मटण किंवा चिकन खाणे टाळावे" .
advertisement
2/5
मटणासारख्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते त्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो. लाल मांस किंवा मटण पचायला कठीण आहे आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे या पदार्थांचे जास्त सेवन टाळायला हवे, असे प्रियांका धागे यांनी सांगितले. लाल मांस हे पचण्यास सर्वात कठीण असते आणि त्यामुळे मल निघण्यास उशीर होतो, त्यामुळे गुदद्वाराच्या विकृतीची लक्षणे किंवा प्रवृत्ती असलेल्या लोकांनी याचे सेवन टाळायला हवे.
advertisement
3/5
मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी तिखट, खारट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तिखट, मसालेदार पदार्थ यामुळे मूळव्याधाचा त्रास अधिक वाढतो. शौचाच्या ठिकाणी आग, जळजळ होऊ शकते. तसेच मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड, जंकफूड, चहा- कॉफी अतिप्रमाणात खाणे पिणे टाळावे कारण यामुळे पोट साफ न होण्याच्या तक्रारी सुरू होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊन हा त्रास आणखीन वाढतो. यासह जास्त प्रमाणात मांसाहार विशेषतः चिकन, मटण, अंडीइत्यादी पदार्थ खाणे टाळा.
advertisement
4/5
मूळव्याधीच्या रुग्णांनी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. उदा, पालेभाज्या, फळ आणि फळ भाज्या. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि परिणामी मूळव्याधीच्या वेदनेतही आराम मिळतो.
advertisement
5/5
मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाणी झाले की शौचास कडक होऊन मूळव्याधीचा त्रास आणखीन वाढतो. तेव्हा दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
mutton : मटण खाल्ल्यामुळे खरंच मुळव्याध होतो का? तुमच्या प्रश्नाचं सोप्पं उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल