TRENDING:

ही डाळ खा अन् बिनधास्त राहा! शुगर, बीपीच नाही तर मुतखडाही होईल गायब

Last Updated:
आपल्याला रोजच्या आहारातील काही भाज्या आणि धान्याचं आरोग्यासाठी महत्त्व बऱ्याचदा माहिती नसतं. कुळीथ डाळ ही यापैकीच असून तिचे अत्यंत आरोग्यदायी फायदे आहेत.
advertisement
1/7
ही डाळ खा अन् बिनधास्त राहा! शुगर, बीपीच नाही तर मुतखडाही होईल गायब
आपल्या आजूबाजूला अशा अनेक बाबी असतात त्यांचा आरोग्याला खूप फायदा होतो. परंतु, अनेकदा त्याबाूबत आपल्याला माहितीच नसते. अतिशय गंभीर आजारांवरही आयुर्वेदिक वनस्पती, पाने, फुले यांच्या माध्यमातून उपचार केले जावू शकतात. असंच एक धान्य म्हणजे कुळीथ डाळ होय. याच कुळीथ डाळीचे फायदे जाणून घेऊ.
advertisement
2/7
कुळीथ डाळ ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. तसेच शरीरातील मुतखडा बाहेर काढण्याचं कामही करते. शुगर नियंत्रणात ठेवण्यासही कुळीथ डाळीचा उपयोग होतो. तसेच वाढलेलं कोलेस्टेरॉलही कमी होऊ शकतं. यासोबतच कुळिथाचे काही आश्चर्यकारक फायदे आहेत. याबाबत जाणून घेऊ.
advertisement
3/7
आहारतज्ज्ञ डॉ राघवेंद्र चौधरी यांनी सांगितलं की, कुळीथ डाळ अगदी सहजपणे उपलब्ध होते. यात फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक आहे. हे शरीराच्या मजबुतीसाठी आणि आरोग्यासाठी लाभदायी असतं. मुतखड्यावर हे अत्यंत परिणामकारक असतं. शरीरातील मुतखढा कुळिथामुळे लगेच बाहेर पडतो. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते. पचन सुधारून कोलेस्ट्रॉल कमी करण्याचंही काम करते.
advertisement
4/7
वजन कमी करण्यासाठी देखील कुळीथ खूप प्रभावी आहे. तरुण, महिला, वृद्ध आणि लहान मुलं देखील सहज वापरू शकतात, असं हे औषध आहे. याच्या वापराने शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. विशेष म्हणजे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्याचा वापरही वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो.
advertisement
5/7
डॉ. चौधरी यांनी सांगतात की, मूठभर हरभरा डाळ घेतल्यावर ती अर्धा लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यातील कुळीथ चावून खा. त्याची पावडर बनवूनही वापरता येते. ही पावडर दूध आणि पाण्यासोबत घेतली जाते.
advertisement
6/7
भाजी म्हणूनही ही डाळ वापरली जाते. अनेकजण या कुळीथ डाळीचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करतात. याचा वापर केल्यानंतर शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात आणि शरीरावर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
advertisement
7/7
सूचना: या बातमीत दिलेले औषध आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
ही डाळ खा अन् बिनधास्त राहा! शुगर, बीपीच नाही तर मुतखडाही होईल गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल