TRENDING:

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही 10 व्यंगचित्र तुम्ही कधीही पाहिली नसतील

Last Updated:
Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक मोठे व्यंगचित्रकार देखील होते. पण अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी काढलेली ही चित्र तुम्ही पाहिली नसतील. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांची झलक पाहुयात.
advertisement
1/10
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही 10 व्यंगचित्र तुम्ही कधीही पाहिली नसतील
फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर मार्मिकमध्ये नियमितपणे चित्रं काढणं सुरू ठेवलं होतं. जसे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/balasaheb-thackeray-birth-anniversary-inspiration-quotes-in-marathi-mhpp-1116649.html">बाळासाहेबांचे विचार</a> परखड होते तशीच त्यांची व्यंगचित्रही मार्मिक असायची.
advertisement
2/10
१६ एप्रिल १९५५मध्ये प्रसिद्ध झालेलं हे व्यंगचित्र. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष कसे अचानक कामाला लागतात याची झलक दाखवणारं.
advertisement
3/10
काश्मीर समस्येचं व्यंगचित्राच्या ठाकरी शैलीत केलेलं विवेचन.
advertisement
4/10
कर न भरणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित करणारं हे चित्रं.
advertisement
5/10
करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली, असं म्हणणाऱ्या सरकारवर ताशेरं ओढणारं हे आणखी एक व्यंगचित्र.
advertisement
6/10
मुंबई कॉर्पोरेशनमधलं विरोधाचं राजकारण टिपणारं हे बोलकं व्यंगचित्र बाळासाहेबांनी चितारलं होतं १७ सप्टेंबर १९५४ मध्ये.
advertisement
7/10
११ सप्टेंबर १९५९मध्ये छापलेलं हे व्यंगचित्र नेहरूंच्या भारत- चीन संबंधांवर टीका करणारं.
advertisement
8/10
नेहरूंच्या चीन धोरणावर टीका करणारं आणखी एक व्यंगचित्र. हे चित्र 11 सप्टेंबर 1959 रोजी प्रसिद्ध झालं होतं.
advertisement
9/10
२९ नोव्हेंबर १९४८ रोजी प्रकाशित झालेलं हे बाळासाहेबांनी काढलेलं व्यंगचित्र महागाईवर आसूड ओढणारं आहे.
advertisement
10/10
१९४९मध्ये काढलेल्या या कार्टूनमधून काश्मीर समस्येसंबंधात झालेल्या सामंजस्य कराराबद्दल भाष्य केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही 10 व्यंगचित्र तुम्ही कधीही पाहिली नसतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल