TRENDING:

'या' 5 संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते देतात शुभ काळाची चाहूल!

Last Updated:
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुःखामागून सुख येतंच, म्हणजेच वाईट दिवसांमागून चांगल्या दिवसांची सुरूवात होतेच. याच शुभ दिवसांची चाहूल आपल्यासोबत घडणाऱ्या काही खास घटना देत असतात. आपल्याला केवळ त्या समजायला हव्या इतकंच. आज आपण ज्योतिशास्त्रानुसार निसर्ग आपल्याला चांगल्या दिवसांचे नेमके काय संकेत देतो, हे जाणून घेणार आहोत. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/6
'या' 5 संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते देतात शुभ काळाची चाहूल!
1. स्वप्नात काळा साप दिसणं : जर स्वप्नात सतत काळा साप दिसला, तर समजून जायचं की आता आपल्या वाटचं दुःख लवकरच संपून आयुष्यात प्रचंड आनंद येणार आहे.
advertisement
2/6
2. सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणं : एखाद्या दिवशी झोपेतून जाग येताच शंखाचा आवाज ऐकू आला किंवा स्वप्नात शंखनाद झाला, तर तुमच्यावर देवी-देवतांची कृपा झाली हे समजून जायचं. कारण हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे अडचणी लवकरच संपणार हे निश्चित होतं.
advertisement
3/6
3. तळहाताला खाज येणं : पुरुषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या तळहातावर खाज आली की समजून जायचं धनलाभ योग निर्माण झाला आहे. आता आपल्याला अचानक पैसे मिळू शकतात.
advertisement
4/6
4. स्वप्नात मंत्र ऐकू येणं : स्वप्नात पूजेचे मंत्रोच्चार ऐकू येणं ही चांगल्या दिवसांची नांदी असते. त्यामुळे आता आपलं आयुष्य आनंदाने बहरणार आहे, हे समजून जायचं.
advertisement
5/6
5. घरातलं वातावरण शांत असणं : घरात सतत वाद होणं अशुभ मानलं जातं. परंतु जर घरातलं वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असेल तर येणारे दिवसही आपल्यासाठी <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/6-june-just-note-this-date-you-might-get-a-promotion-on-this-day-l18w-mhij-1190394.html">शुभ</a> असतात.
advertisement
6/6
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/vastu-tips-the-ideal-bedroom-for-a-couple-mhij-1190618.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
'या' 5 संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते देतात शुभ काळाची चाहूल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल