Israel Hezbollah Attack : आकाशात भिडले हिजबुल्लाह-इज्रायल; युद्धाचे थरारक Photo पाहून हैराण व्हाल!
- Published by:Shreyas
Last Updated:
इज्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर 100 लढाऊ विमानांनी हल्ला केल्यामुळे मिडल इस्टमध्ये अचानक तणाव वाढला आहे. यानंतर हिजबुल्लाहने इज्रायली लष्कराच्या ठिकाणांवर 300 रॉकेटनी प्रतिहल्ला केला. जवळपास 6 तास आकाशामध्ये रॉकेट आणि बॉम्बचा पाऊस पडत होता. युद्धाचे हे थरारक फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
advertisement
1/6

शांतता वार्ता सुरू असतानाच रविवारी सकाळी इज्रायल लष्कराने आपण 100 फायटर जेट पाठवून हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केल्याचं सांगितलं. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी करण्यात आल्याचंही इज्रायलच्या लष्कराने स्पष्ट केलं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार 2006 नंतर इज्रायलकडून केला गेलेला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.
advertisement
2/6
सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा आकाशात रॉकेट अशी उडत होती जसं फटाके उडवले जात आहेत. हल्ल्यानंतर लगेचच इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इमरजन्सी नॅशनल सिक्युरिटीची मीटिंग बोलावली. तसंच इज्रायलला बदला पूर्ण झाला नसल्याचा इशाराही नेतन्याहू यांनी दिला.
advertisement
3/6
एका इज्रायली लढाऊ विमानाद्वारे फ्लेयर्स फायर करतानाचे फोटोही समोर आले. जिकडे इज्रायलच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकले तिकडे धूर आणि आग लागली होती. एवढच नाही तर इज्रायलने ड्रोननेही हल्ले केले.
advertisement
4/6
जेव्हा आम्ही हल्ला केला त्याच्या अर्ध्या तासानंतर हिजबुल्लाहही प्रतिहल्ला करायच्या तयारीत होतं, पण आम्हाला आधीच कळालं आणि त्यांची ठिकाणं नेस्तनाबूद करण्यात आली जिथून प्रतिहल्ला केला जाणार होता, असं इज्रायलकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
5/6
हिजबुल्लाहकडून 320 पेक्षा जास्त कत्युशा रॉकेट डागले गेले, यात इज्रायली सैन्याच्या 11 ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं. सर्वाधिक रॉकेट इज्रायलची राजधानी तेल अवीववर डागली गेली.
advertisement
6/6
या युद्धामध्ये दोन्हीकडे फार जीवितहानी झाली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार इज्रायलच्या एका सैनिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर लेबनानमध्ये एका कारवर ड्रोन पडलं, ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Israel Hezbollah Attack : आकाशात भिडले हिजबुल्लाह-इज्रायल; युद्धाचे थरारक Photo पाहून हैराण व्हाल!