फक्त आपले हात दाखवून महिन्याला लाखो रूपये कमवते महिला; खास आहे ही नोकरी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
प्रत्येकजण चांगल्या नोकरीच्या शोधात असतो. काम कमी आणि पगार भरपूर असावा, अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते.
advertisement
1/7

मात्र, जगात अशाही काही नोकऱ्या आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकून आपल्याला विश्वास बसत नाही. ज्यात अगदी सोप्या कामासाठी लाखो रूपये पगार दिला जातो. उदाहरणार्थ, काही लोक विचित्र आवाज करून पैसे कमवतात तर काही ओरडून.
advertisement
2/7
काही लोक पायांचे फोटो विकून लाखो कमावतात तर काही नुसते हात दाखवून पैसे कमवतात. अशाच एका महिलेची कहाणी आता समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका महिलेचा दावा आहे की, फक्त हात दाखवून ती एका वर्षात अनेक लोकांच्या सॅलरी पॅकेजइतकी कमाई करत आहे.
advertisement
3/7
ती न्यूयॉर्कची रहिवासी आहे आणि अभिमानाने सांगते की तिला पैसे कमावण्यासाठी फक्त तिच्या सुंदर हातांची गरज आहे. चला जाणून घेऊया की ही महिला नेमकं काय करते?
advertisement
4/7
आपण ज्या महिलेबद्दल बोलत आहोत तिचं नाव अलेक्झांड्रा बेरोकल आहे. ती व्यवसायाने मॉडेल आहे पण तिला कुठेही तोंड दाखवायची गरज नाही, ती फक्त हात प्रोडक्ट हातात पकडणं ही कामं करून पैसे कमावते.
advertisement
5/7
37 वर्षीय अलेक्झांड्रा कपमध्ये चहा किंवा कॉफी ओतणं, प्रोडक्ट्स पकडणं यासारख्या गोष्टी शूट करते, ज्यामध्ये फक्त तिचे हात दिसतात. 2019 पासून तिने हँड मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
advertisement
6/7
तिने मोठमोठ्या ब्रँडसाठी मॉडलिंग केलेलं आहे. ज्यात ती हातात प्रोड्क्ट्स पकडून फोटोशूट करून घेते. विशेष म्हणजे तिला तिचं काम पार्टटाईमच करावं लागतं आणि तिला वर्षाला $30,000 म्हणजेच 25 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात.
advertisement
7/7
ती म्हणते की, जेव्हा तिने पोर्टफोलिओ सबमिट केला तेव्हा 10 मिनिटांत तिची निवड झाली. हाताचा रंग, नखं आणि आकार यामुळे तिला हे काम मिळालं. त्यासाठी तिला हातांची काळजी घ्यावी लागते. ती हातमोजे घालून घरातील काम करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
फक्त आपले हात दाखवून महिन्याला लाखो रूपये कमवते महिला; खास आहे ही नोकरी