Vastu Tips: घराचं सांडपाणी या दिशेलाच बाहेर पडायला हवं; एक चूक अनेक त्रासांचे मूळ कारण ठरते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार घरात सगळं ठीक असतानाही अडचणी येत असतील तर एकदा घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची दिशा पाहावी लागेल. वास्तुशास्त्रानुसार ती योग्य नसेल तर तुम्हाला त्रास जाणवू शकतो. घरातून बाहेर पडणारे सांडपाण्याविषयी वास्तु नियम जाणून घेऊ.
मुंबई : घर वास्तुशास्त्रानुसार असणं फायदेशीर ठरतं. बऱ्याचदा सगळं ठीक असताना घरात वारंवार आजारपण येत राहतं. छोट्या-मोठ्या कारणांमुळे घरात कोणी आजारी असते, आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. कमावत्या व्यक्ती चांगली कमाई करत असतात पण त्यांना काही ना काही समस्या भेडसावत राहतात. असं होत असल्यास आपण घराच्या वास्तुशास्त्राकडे लक्ष दिलं पाहिजे. कुंडलीत ग्रहांची स्थिती योग्य असून भागत नाही तर वास्तुशास्त्रसुद्धा ठीक नसेल तर तुम्हाला नक्कीच त्रास सोसावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार घरात सगळं ठीक असतानाही अडचणी येत असतील तर एकदा घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची दिशा पाहावी लागेल. वास्तुशास्त्रानुसार ती योग्य नसेल तर तुम्हाला त्रास जाणवू शकतो. घरातून बाहेर पडणारे सांडपाण्याविषयी वास्तु नियम जाणून घेऊ.
घराचे सांडपाणी बाहेर पडण्याची दिशा -
घराचे सांडपाणी तसेच इतर पाणी बाहेर पडण्यासाठी उतार नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. घराच्या छताचा उतार ईशान्य दिशेला असणे देखील फायदेशीर मानले जाते कारण पाऊस पडतो तेव्हा पाणी नेहमीच उत्तर किंवा पूर्व दिशेने वाहत राहावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात. याशिवाय घरातील गटार नेहमी झाकलेले असावे.
advertisement
सांडपाणी बाहेर पडण्याची दिशा ही नसावी -
घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा किंवा सांडपाण्याचा उतार कोणत्याही परिस्थितीत नैऋत्येकडे नसावा. याचा परिणाम घरातील लोकांच्या आरोग्यावर होतो आणि लोक सतत आजारी पडू शकतात. सांडपाण्याची व्यवस्था पश्चिम दिशेला असेल तर त्याला मुलांशी संबंधित समस्या येऊ शकतात आणि जर ती दक्षिण दिशेला असेल तर त्यामुळे संपत्तीचा नाश होतो. घरातील शांती देखील संपते, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घराचं सांडपाणी या दिशेलाच बाहेर पडायला हवं; एक चूक अनेक त्रासांचे मूळ कारण ठरते