Hyundai-TVS चं नवं इनोव्हेशन! इलेक्ट्रिक A3 रिक्षाचं पेटंट घेतलं, डिझाइन एकदम फर्स्टक्लास
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hyundai Motor आणि TVS Motor यांनी व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. त्यांनी A3 आणि A4 या थ्री-व्हीलर आणि फोर-व्हीलर संकल्पना तयार केल्या आहेत.
मुंबई : Hyundai Motor आणि TVS Motor या दोन कंपन्यांनी एकत्र येत व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. त्यांनी एकत्र मिळून थ्री व्हिलर आणि फोर व्हिलर व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना तयार केली आहे. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी ही वाहने सादर केली.
A3: Hyundai चं इलेक्ट्रिक रिक्षाचं कमर्शियल व्हेहिकल
Hyundai ने त्यांच्या A3 नावाच्या इलेक्ट्रिक रिक्षा डिझाइनसाठी पेटंट घेतलं आहे. हे वाहन खास करून शहरातील अरुंद रस्त्यांसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. यामध्ये पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरही सहज चालण्याची क्षमता आहे.
डिझाइन आणि फिचर्स थक्क करणारी
advertisement
A3 रिक्षामध्ये पुढील खास वैशिष्ट्यं पाहायला मिळतात:
- अँगल विंडस्क्रीन
- जास्त लेगरूम
- मोठा व्हीलबेस
- चांगल्या राईडसाठी मोठे 14-इंच टायर्स
- स्लिम इन्स्ट्रुमेंट कन्सोल
- ऑटो चार्ज लेव्हल इंडिकेटर
- ओडोमीटर आणि ट्रिप मीटर
- हँडलबारवर फोन होल्डर
- छोटा पंखा आणि छत्रीसुद्धा
हे सर्व वैशिष्ट्यं प्रवाशांसाठी अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव देतील.
पेटंट फक्त डिझाइनसाठी
सध्या हे डिझाइन फक्त संकल्पना (concept) स्वरूपात आहे. प्रत्यक्ष उत्पादनासाठी अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. TVS केवळ उत्पादन आणि मार्केटिंगसाठी सहभागी आहे. Hyundai ने डिझाइन पेटंट घेतलं असलं तरी दोन्ही ब्रँडमध्ये बंधनकारक करार झालेले नाहीत.
advertisement
भारतासाठी मायक्रो मोबिलिटीचं भविष्य
Hyundai ने A3 (थ्री-व्हीलर) आणि A4 (फोर-व्हीलर) या संकल्पना मायक्रो मोबिलिटी सेगमेंटसाठी ठेवलेल्या आहेत. हे वाहन सामान्य माणसांसाठी उत्पन्नाचं साधन ठरू शकतं. मात्र, ते प्रत्यक्ष बाजारात कधी येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai-TVS चं नवं इनोव्हेशन! इलेक्ट्रिक A3 रिक्षाचं पेटंट घेतलं, डिझाइन एकदम फर्स्टक्लास