जबरदस्ती केली, शरीराला घेतला चावा, लॉ कॉलेज विद्यार्थिनीच्या सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

Last Updated:

तीन दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेडीकल रिपोर्टमधून मोठा खुलासा समोर आला आहे.

News18
News18
Law Collage Student Gangrape Case:  तीन दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे, त्याने २५ जून रोजी दोन विद्यमान विद्यार्थ्यांसह तरुणीवर अत्याचार केला. कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वैद्यकीय तपासणीत विद्यार्थिनीच्या सामूहिक बलात्काराच्या आरोपाची पुष्टी झाली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकात्यातील साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर २५ जून रोजी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. वैद्यकीय अहवालात जबरदस्तीने शारीरिक संबंध, शरीरावर चाव्याच्या खुणा आणि नखांनी ओरखडे असल्याचे पुरावे आढळले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, मुख्य आरोपी, जो महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि प्रॅक्टिसिंग फौजदारी वकील आहे, त्याने तिच्यावर बलात्कार केला, तर इतर दोघे खोलीबाहेर पहारा देत होते.
advertisement
मुख्य सरकारी वकील सोरिन घोषाल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, जर सामूहिक बलात्काराच्या घटनेत एका व्यक्तीनेही बलात्कार केला, परंतु बाकीचे त्याला मदत करत असतील किंवा पीडितेशी समान हेतू ठेवतात, तर ते देखील तितकेच दोषी आहेत. म्हणून, हा सामूहिक बलात्काराचा खटला आहे आणि या प्रकरणात तिघेही आरोपी आहेत.
कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा आणि संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रूपेश कुमार यांनी स्वतः कसबा पोलीस स्टेशन गाठले आणि घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये जाऊन प्रकरणाच्या सखोल तपास केला. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे: कल्याण बॅनर्जी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की अशा घटना खूप लज्जास्पद आहेत आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
advertisement
१२ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पंजा म्हणाल्या की, पोलिसांना तक्रार मिळताच १२ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकार आणि पोलीस हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कोणतेही राजकारण होऊ नये.
मराठी बातम्या/क्राइम/
जबरदस्ती केली, शरीराला घेतला चावा, लॉ कॉलेज विद्यार्थिनीच्या सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement