Crime : घरात घुसून भरदिवसा गोळ्या झाडून तिघांची हत्या; 70 वर्षांच्या 'गब्बर सिंह'ला मुलासह अटक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
वाद इतका विकोपाला गेला की दुसऱ्या बाजूने गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला.
लखनऊ : जमिनीच्या वादातून पती-पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या लल्लन खान आणि त्याचा मुलगा फराज खान यांना अटक करण्यात आलीय. लखनऊ ट्रिपल मर्डर प्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत होते. शुक्रवारी मलिहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहमतनगर गावात जमिनीवरून त्यांचा वाद झाला होता. याच वादातून लल्लन खानने तिघांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादात मुनीर, फरहीन आणि त्यांचा मुलगा हंजला यांची हत्या करण्यात आली होती. मृत्यू झालेली फरहीन ही लल्लन खान यांची नातलग होती. त्यांच्यात जमिनीवरून वाद होता. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी काही लोक थार गाडीने पोहोचले आणि त्यांच्यात जमिनीच्या मुद्द्यावरून वाद झाला.
वाद इतका विकोपाला गेला की दुसऱ्या बाजूने गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पितापुत्र फरार झाले होते. हत्याकांडाचा व्हिडीओ घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
advertisement
ट्रिपल मर्डर केसमधील प्रमुख आरोपी लल्लन खान हा हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर २४ पेक्षा जास्त वेगवेगळ्या केसेस आहेत. ७० वर्षे वय असलेल्या लल्लन खानची १९८० च्या दशकात दहशत होती. तेव्हा लल्लन सिंह घोड्यावरून फिरायचा आणि स्वत:ला गब्बर सिंह म्हणायचा. आता पोलिसांनी लल्लन खान आणि फराजला अटक केलीय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime : घरात घुसून भरदिवसा गोळ्या झाडून तिघांची हत्या; 70 वर्षांच्या 'गब्बर सिंह'ला मुलासह अटक








