Salman Khan Birthday: भरमसाठ नाही, भाईजानच्या बर्थडेला आणले तीनच केक, पण एकदम भारी, पाहा पार्टीचा INSIDE VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भाईजान सलमान खान आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशी त्याच्यावर शुभेच्छा आणि आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानची बहिण अर्पिता शर्माने त्याच्यासाठी खास पार्टी होस्ट केली होती.
मुंबई : भाईजान सलमान खान आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशी त्याच्यावर शुभेच्छा आणि आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानची बहिण अर्पिता शर्माने त्याच्यासाठी खास पार्टी होस्ट केली होती. सलमानच्या बर्थडे बॅशला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. सर्वजण पार्टीसाठी अर्पिताच्या घरी पोहोचले. यावेळीचे पार्टीतील INSIDE PHOTO समोर आले आहेत.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला कडक सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण स्वॅगसह पोहोचला. सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत ग्रँड एन्ट्रीचे फोटो समोर आल्यानंतर आता पार्टीतील इनसाइड फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये मजा-मस्ती, धमाल आणि खूप सारे केक पहायला मिळत आहे.
Salman Khan 59th Birthday: सलमानच्या बर्थडेला एकत्र आलं पूर्ण बॉलिवूड, रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया आणि EX संगीताचा कातिल लूक! पाहा PHOTOS
म्युझिक कंपोझर साजिद खान सलमान खानच्या 59 व्या बर्थ डे पार्टीला उपस्थित होते. त्यांनी या पार्टीतील व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानसाठी खूप खास केक आलेले दिसत आहे. यातील एक तर चार मोठ्या लेअरचा आहे. बाकी रंगबेरंगी छान केक आहेत. सलमान केक कापत असताना त्याच्या बाजूला आयुष शर्मा आणि भाजी आयत आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, कंपोझर साजिद खान यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊसही पहायला मिळतोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2024 2:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan Birthday: भरमसाठ नाही, भाईजानच्या बर्थडेला आणले तीनच केक, पण एकदम भारी, पाहा पार्टीचा INSIDE VIDEO


