Marathi Serial : 'काजळमाया'मुळे स्टार प्रवाहच्या 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? चेटकीणीच्या येण्याने मोठा बदल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Serial : 'काजळमाया' सुरू होणार म्हणजे 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका संपणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काय आहे मालिकांचं अपडेट?
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहेत. नशीबवान आणि लपंडाव या दोन नव्या मालिकांनंतर आता 'काजळमाया' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्या मालिका आल्यानंतर जुन्या मालिकांची गणितं बिघडतात. एकतर त्या मालिका बंद होतात किंवा त्यांच्या वेळा तरी बदलतात. काजळमाया या मालिकेच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. काजळमाया ही हॉरर मालिका आहे. नवा जॉनर असलेली ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते मात्र मालिकेची रिलीज डेट समोर आली आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 'काजळमाया' सुरू होणार म्हणजे 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका संपणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काय आहे मालिकांचं अपडेट?
अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'काजळमाया' ही हॉरर मालिका येत्या 27 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. रात्री 10.30 वाजता ही मालिका सुरू होणार. काजळमाया सुरू होत असल्याने स्टार प्रवाहवरील 'तू ही माझा मितवा' ही 10.30 वाजता लागणारी मालिका संपणार का असं अनेकांना वाटलं. पण महत्त्वाची अपडेट अशी आहे की, 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.
advertisement
'तू ही रे माझा मितवा' ही मालिका आता रात्री 8 वाजता पाहता येणार आहे. 10.30 मालिका आता लवकर म्हणजे रात्री 8 वाजता पाहायला मिळणार त्यामुळे मालिकेचे चाहते खुश आहेत. पण 'तू ही रे माझा मितवा' 8 वाजता लागणार म्हणजेच 8 ला लागणारी 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का?
advertisement
'काजळमाया' या मालिकेमुळे मालिकांच्या वेळांची गणितं बदलली आहे. रात्री 8 वाजता लागणारी 'काय होतीस तू काय झालीस तू' ही संपणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता रात्री 8 ऐवजी रात्री 11 वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Serial : 'काजळमाया'मुळे स्टार प्रवाहच्या 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? चेटकीणीच्या येण्याने मोठा बदल