"तुझं जाणं स्वीकारणं कठीण..."; बॉलिवूड अभिनेत्रीची रतन टाटांसाठी भावुक पोस्ट
- Published by:Minal Gurav
- trending desk
Last Updated:
Simi Garewal emotional post for ratan tata : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं रतन टाटा यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
मुंबई : भारताचे 'रत्न' म्हणवले जाणारे दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता हयात राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी रात्री उशिरा वयाच्या 86व्या वर्षीय मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. टाटा 1970 आणि 80 च्या बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सिमी गरेवालच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्यांचं प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सिमी यांनी जाहीरपणे प्रेमाचा स्वीकार केला होता. रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी यांना दु:ख झालं. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली.
अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी दु:ख व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी आपला आयकॉनिक टॉक शो 'रेंदेव्यूज विथ सिमी गरेवाल' मधील (Rendezvous with Simi Garewal) टाटांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. सिमी यांनी फोटोसह लिहिलं, "सर्वजण म्हणतात तू निघून गेला आहेस.…तुझं जाणं स्वीकार आणि सहन करणं कठीण आहे…फार कठीण...फेअरवेल माय फ्रेंड. #RatanTata."
advertisement
रतन टाटांसोबतच्या नातेसंबंधाची स्वतः दिली होती कबुली
सिमी गरेवाल यांनी 2011मधील एका मुलाखतीत रतन टाटांसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली होती. त्यांच्या मते रतन टाटा 'परफेक्ट जंटलमन' होते. त्या दोघांच्या नात्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "माझं आणि रतन यांचं नातं खूप जुनं आहे. ते परफेक्ट आहेत, त्यांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ चांगला आहे, ते नम्र आणि परफेक्ट जंटलमन आहेत. पैशातून त्यांना कधीच प्रेरणा मिळाली नाही. परदेशात असताना त्यांच्या वागण्यात जो मोकळेपणा असतो तो भारतात असताना नसतो."
advertisement
नातेसंबंध संपले पण मैत्री वर्षानुवर्षे टिकली
असं म्हटलं जातं की, टाटा आणि सिमी फार कमिटेड होते. पण, दुर्दैवाने त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचलं नाही. त्यांनी लग्न करण्याचा विचार केला होता. पण, त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. सिमी यांनी चुन्नामल कुळातील आणि दिल्लीत जन्मलेल्या रवी मोहन यांच्याशी लग्न केलं. मात्र, 1979 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतरही सिमी आणि रतन टाटा यांची मैत्री वर्षानुवर्षे टिकून राहिली.
advertisement

चार वेळा पडले प्रेमात पण...
कार्य नैतिकता, नम्रता आणि उदारतेसाठी रतन टाटांचं सर्वत्र कौतुक केलं जातं. पण, वैयक्तीक आयुष्यात ते कधीही स्थिर होऊ शकले नाहीत. त्यांनी कधीही लग्न केलं नाही. एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की, ते चार वेळा प्रेमात पडले होते. पण, प्रत्येकवेळी विविध कारणांमुळे लग्न करता आलं नाही.
advertisement
रतन टाटांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही. संपूर्ण बॉलिवूड त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त करत आहे. रतन टाटांनी भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपला आकार दिला आणि बोर्डरूमच्या पलीकडे असलेल्या जीवनाला स्पर्श केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 11:51 AM IST