मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी! 54 वर्षांच्या अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टेलिव्हिजन मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक शेवट झाला आहे. अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय.
मुंबई : मनोरंजन विश्वात धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात खोलवर बुडून मृत्यू झाला आहे. वयाच्या 54व्या वर्षी अभिनेत्याचा धक्कादायक शेवट झाला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याबरोबर नेमकं काय घडलं?
समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या अभिनेत्याचं नाव माल्कम-जमाल वॉर्नर असं असून तो अमेरिकन टीव्ही मालिकेत काम करणारा प्रसिद्ध चेहरा होता. The Cosby Show या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही मालिकेत तो थिओडोर हक्सटेबलची भूमिका साकारत होता. माल्कम वॉर्नर आपल्या कुटुंबासह कोस्टा रिका येथे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तिथे काहुइटा शहराजवळील प्लेया ग्रांडे या समुद्रकिनारी पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाने त्याला खोल समुद्रात ओढले आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी 2:30 वाजता ही घटन घडली.
advertisement
माल्कम समुद्रात वाहून जात असल्याचं पाहिल्यानंतर समुद्रकिनारी उपस्थित अनेक लोकांनी वॉर्नर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रेड क्रॉसने त्यांना मृत घोषित केलं. कोस्टा रिका न्यायिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
advertisement

बाल कलाकार म्हणून सुरुवात
माल्कम हा न्यू जर्सीचा रहिवासी होता. वयाच्या 9व्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. Fame या शोमधून त्याने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर The Cosby Show मध्ये बिल कॉस्बी आणि फिलिसिया रशाद यांच्या मुलाची म्हणजेच थिओडोर हक्सटेबल ही प्रमुख भूमिका मिळाली.
advertisement
माल्कम वॉर्नरच्या मृत्यूवर बिल कॉस्बी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी WPVI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "मी धक्क्यात आहे. मला त्याची आई आठवतेय जिने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली." 1986 मध्ये वॉर्नरना The Cosby Show मधील भूमिकेसाठी Primetime Emmy नामांकन मिळालं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 11:34 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी! 54 वर्षांच्या अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू