'मी त्यांची नाजायज मुलगी आहे', ट्विंकल खन्नाचं ऋषी कपूरबद्दल धक्कादायक विधान, आलिया आली टेन्शनमध्ये

Last Updated:

Twinkle Khanna - Rishi Kpaoor : ऋषी कपूर यांच्या आठवणींना काजोल आणि ट्विंकलच्या शोमध्ये उजाळा दिला. वरुण, आलिया, ट्विंकल यांनी त्यांच्या मजेदार किस्स्यांची आणि राहामधील ऋषी कपूरच्या आठवणी सांगितल्या, ट्विंकल खन्नानं जे सांगितलं ते ऐकून आलिया टेन्शनमध्ये आली.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आता आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी आणि इंडस्ट्रीतले किस्से आजही जिवंत आहेत. ते त्यांच्या स्पष्ट बोलण्याने अनेकदा चर्चेत राहतात. म्हणूनच केवळ चाहतेच नाही तर त्यांच्यासोबत काम करणारे स्टार देखील त्यांची आठवण ठेवतात. अलीकडेच काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शोमध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. शोमध्ये ट्विंकलने तिला ऋषी कपूरची नाजायज मुलगी का म्हटले जाते हे सांगितले. वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी गोड आठवणी शेअर केल्या.
ऋषी कपूर हे बॉलिवूडमधील अशा स्टार्सपैकी एक होते जे त्यांच्या मूडीपणासाठी ओळखले जात होते. त्यांना कधी कोणाचा राग येईल हे सांगणं कठीण होतं.  ते प्रचंड मूडी असूनही  एक उत्तम विनोदी कलाकारही होते. काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शोमध्ये दिसलेल्या वरुण धवनने त्यांच्या पहिल्या चित्रपट "स्टुडंट ऑफ द इयर" मधील एक मजेदार गोष्ट शेअर केली.
advertisement

'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सेटवरचा किस्सा 

वरुण धवनने खुलासा केला की, एका फुटबॉल सीनच्या शूटिंग दरम्यान ऋषी कपूरला त्याच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या केसांमधील जेलची समस्या होती. वरुण हसला आणि म्हणाला, "ऋषीजी म्हणाले, 'हे काय आहे? तुमचे केस अजिबात हलत नाहीत. वारा असो किंवा वादळ तुमचे केस एक इंचही हलत नाहीत. तुम्ही फुटबॉल खेळत आहात तुमचे केस हलले पाहिजेत."
advertisement
वरुणने पुढे म्हणाला, ऋषी कपूर त्याच्याकडे आले आणि त्याच्या केसांना स्पर्श केला. त्यानंतर त्याने दिग्दर्शक करण जोहरला फोन करून तक्रार केली. करणने वरुणला आदेश दिला, "त्याचे केस हलवा." पण वरुणने उत्तर दिले, "करण, माझे केस जेलने कव्हर केलेत ते हलवता येणार नाहीत" ऋषी कपूर रागावले आणि म्हणाले, "हे जेल काढा, मी शॉट देणार नाही." जेल काढल्याशिवाय पुढचा शॉट झाला नाही. वरुणचा हा किस्सा ऐकून सगळेच हसले.
advertisement

राहा म्हणजे मिनी ऋषी कपूर 

ऋषी कपूरची सून होण्यापूर्वी, आलिया भट्टने त्यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. "स्टुडंट ऑफ द इयर" नंतर, त्यांनी 2016 मध्ये "कपूर अँड सन्स" मध्ये एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, आलियाने त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. हा तो काळ होता जेव्हा ती रणबीर कपूरला डेट करत नव्हती परंतु ती दररोज संध्याकाळी ऋषी कपूरसोबत मजेदार क्षण घालवत असे, गोष्टी ऐकायची आणि त्यांच्याबरोबर जेवण करायची.
advertisement
आलिया म्हणाली, "ऋषीजींकडे सांगण्यासाठी खूप छान गोष्टी होत्या." शूटिंगनंतर ते सर्वांना एकत्र जेवणासाठी बोलवायचे. तो खूप छान माहोल होता.  मला त्यांची खूप आठवण येते." आलियाने असेही उघड केले की तिची मुलगी राहामध्ये ऋषी कपूरची झलक दिसते. ती म्हणाली, "जेव्हा लोक राहाला पाहतात तेव्हा ते म्हणतात की ती एक मिनी ऋषी कपूर आणि आलिया भट्ट आहे. तिच्यात ऋषीजींची थोडीशी झलक आहे, जी वेळोवेळी दिसून येते."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by prime video IN (@primevideoin)



advertisement

ऋषी कपूर आणि डिंपल कापाडिया यांचा किस्सा 

शो होस्ट ट्विंकल खन्नानेही ऋषी कपूरशी संबंधित एक मजेदार घटना शेअर केली. तिने सांगितले की, ऋषी कपूरने एकदा तिच्या (ट्विंकलच्या) वाढदिवशी ट्विट केले होते, "जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतीस, तेव्हा मी तिच्यासाठी गाणी गायली होती." या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि लोक तिला ऋषी कपूरची "नाजायज मुलगी" मानू लागले. ट्विंकल हसली आणि म्हणाली, "त्यानंतर, ऋषीजींना ट्रोल करण्यात आले आणि त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले"
ट्विंकलचे विधान ऐकून आलिया आश्चर्यचकित झाली. आलियाची अस्वस्थता पाहून काजोलने विनोद करत म्हणाली, "आलियाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पहा." ट्विंकलने लगेच उत्तर दिलं, "मी तुझी वहिनी नाही. हा एक गैरसमज होता."  ऋषी कपूर आणि ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये राज कपूरच्या "बॉबी" चित्रपटातून एकत्र पदार्पण केलं होतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी त्यांची नाजायज मुलगी आहे', ट्विंकल खन्नाचं ऋषी कपूरबद्दल धक्कादायक विधान, आलिया आली टेन्शनमध्ये
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement