लंडन स्पेशल स्ट्रॉबेरी चॉकलेट, खवय्यांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच, एकदा खाल तर पुन्हा याल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिकमध्ये अनेक नवनवीन खाद्यपदार्थ आपल्याला चाखायला मिळत असतात. लंडनची स्पेशल स्वीड डेझर्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट हे चवीला उत्तम असल्याने लहान वर्गासोबत मोठे देखील हे खाण्यापासून आपला मोह आवरत नाही आहेत.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये अनेक नवनवीन खाद्यपदार्थ आपल्याला चाखायला मिळत असतात. त्याची चव देखील आनंद देणारी असते. त्यातच नाशिकमध्ये चॉकलेट प्रेमींसाठी स्पेशल लंडनचे डेझर्ट दिपाली हिरे यांनी पहिल्यांदा नाशिककरांसाठी आणले आहे. लंडनची स्पेशल स्वीड डेझर्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट हे चवीला उत्तम असल्याने लहान वर्गासोबत मोठे देखील हे खाण्यापासून आपला मोह आवरत नाही आहेत.
advertisement
दिपाली ह्या एक गृहिणी आहेत परंतु त्यांना काही ना काही नवीन खाद्यपदार्थांमध्ये तयार करण्याची आधीपासूनच रुची असल्याने त्यांनी जीडी केक शॉची गेल्या 2 वर्षांपासून सुरुवात केली. यांच्याकडे 20 पेक्षा अधिक स्वीट डेझर्ट आणि केकमध्ये प्रकार त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. 50 रुपयांपासून यांच्याकडे युनिक डेझर्ट मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात यांच्याकडे नेहमी गर्दी बघायला मिळत असते. सध्या स्ट्रॉबेरीचे सिझन चालू असल्याने नाशिकमध्ये कुठेही ना मिळणारे असे स्ट्रॉबेरीचे युनिक डेझर्ट यांच्याकडे अगदी कमी दरात उपलब्ध आहे.
advertisement
काय आहे युनिक?
दिपाली ह्या स्वतः हा एक फूडी आहेत. त्यामुळे त्यांना नवीन नवीन चव चाखायला आवडत असते. यामुळे त्या नेहमी सोशल मीडिया वरून काही ना काही शोधून त्यात त्यांची कला वापरून एक नवीन पदार्थ तयार करत असतात. सध्या स्ट्रॉबेरीचा सिझन चालू असल्याने त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी डेझर्टमध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट, स्ट्रॉबेरी ब्राउनी, स्ट्रॉबेरी ब्राउनी टब, स्पेशल लंडन डिश म्हणजे चॉकलेट स्ट्रॉबेरी कप यात भरभरून स्ट्रॉबेरी आणि 3 प्रकारचे विविध चॉकलेट असल्याने याची चव सर्वांनाच आवडत आहे. तसेच कुल्लड चॉकलेट देखील यांचा अतिशय उत्तम असा पदार्थ आहे. तसेच सर्व डेझर्ट हे 50 रुपयांपासून त्यांच्याकडे उपलब्ध असून केकमध्ये देखील अनेक प्रकार देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
advertisement
तुम्हाला देखील ही लंडन स्पेशल स्ट्रॉबेरी चॉकलेट खाण्याची इच्छा असल्यास नाशिक मधील शहिद सर्कल वरील जीडी केक या ठिकाणी नक्की भेट द्या.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 26, 2024 5:20 PM IST
मराठी बातम्या/Food/
लंडन स्पेशल स्ट्रॉबेरी चॉकलेट, खवय्यांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच, एकदा खाल तर पुन्हा याल