काळे ओठ होतील गुलाबी, लोण्यासारखे दिसतील मऊ; खूप काही करायचं नाहीये, फक्त...

Last Updated:

ओठ सतत काळे पडणं हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे असं वारंवार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.

ओठ कायम छान मऊ आणि आकर्षक राहतील.
ओठ कायम छान मऊ आणि आकर्षक राहतील.
काजल मनोहर, प्रतिनिधी
जयपूर : ओठ म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात गुलाबी, मऊ, नाजूक ओठ. ज्यांना आपण सुंदर दिसावं असं वाटतं, ते गुलाबी ओठांसाठी वेगवेगळे उपाय करतात. परंतु काहीच दिवसात ओठांचा गुलाबीपणा, मऊपणा निघून जातो. त्यामुळे आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे ओठ कायम छान मऊ आणि आकर्षक राहतील.
मेकअप आर्टिस्ट सरिता प्रजापत यांनी सांगितलं की, उन्हात जास्त काळ राहिल्यानं ओठ हळूहळू काळे पडू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडताना कायम ओठांवर सनस्क्रीन लोशन लावावं. त्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
advertisement
लक्षात घ्या, ओठ सतत काळे पडणं हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे असं वारंवार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. काहीवेळा मॉइश्चरायझरच्या कमतरतेमुळेही ओठांवर काळे डाग पडू शकतात. असं होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावं, संपूर्ण शरीर हायड्रेटेड ठेवावं आणि ओठांना मॉइश्चरायझर लावावं.
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना दुधावरची साय लावली तर उत्तम. यामुळे ओठ गुलाबी राहतील आणि काळे पडणार नाहीत. शरिरात हॉर्मोन्स असंतुलित झाले तरी ओठांचा रंग डार्क होऊ शकतो. त्यामुळे लिपस्टिकचा वापर जास्त करू नये. ओठ जेवढे नैसर्गिक असतात तेवढे सुदृढ आणि छान दिसतात. सतत डार्क लिपस्टिक वापरल्यानंही ओठांचा रंग डार्क होऊ लागतो. काही लोकांना ओठ चावण्याची सवय असते. असं करू नये, कारण यामुळे ओठ फाटू शकतात आणि ती जखम लवकर भरून निघत नाही.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
काळे ओठ होतील गुलाबी, लोण्यासारखे दिसतील मऊ; खूप काही करायचं नाहीये, फक्त...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement