Monsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी? स्वयंपाकघरातील हे 5 मसाले ठरतील आरोग्यासाठी वरदान, Video

Last Updated:

Monsoon Health Tips: पावसाळा सुरु झाला की हवामानात बदल होतो, दमटपणा वाढतो आणि संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. या ऋतूत सर्दी, खोकला, ताप, अपचन यांसारखे त्रास सहज होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

+
पावसाळ्यात

पावसाळ्यात स्वयंपाकघरातील 5 मसाले देतील नैसर्गिक संरक्षण ज्याने वाढेन रोगप्रतिका

मुंबई: पावसाळा सुरु झाला की हवामानात बदल होतो, दमटपणा वाढतो आणि संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. या ऋतूत सर्दी, खोकला, ताप, अपचन यांसारखे त्रास सहज होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार काही स्वयंपाकघरातील मसाले नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात. हे पाच प्रभावी मसाले कोणते आहेत पाहुयात.
हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतो. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, रक्तशुद्धी करते आणि सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून संरक्षण देते.
उपयोग: रोज रात्री गरम दूधात हळद मिसळून घ्या.
advertisement
आलं: आलं हे नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटीवायरल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. पावसाळ्यात होणारा अपचनाचा त्रास, घशातील खवखव आणि सर्दी यावर आले खूप उपयुक्त आहे.
उपयोग: आलं चहा किंवा गरम पाण्यात मधासोबत सेवन करा.
मिरी : मिरी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवते. यातील पिपरिन हे घटक अन्नातील पोषकतत्त्वांचे शोषण वाढवते आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते.
advertisement
उपयोग: सूप, कढी किंवा चहामध्ये थोडी मिरी पूड टाका.
तुळस: तुळस ही आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट औषधी वनस्पतींपैकी एक आहे. तिच्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तुळस श्वसन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे.
उपयोग: तुळशीची पाने उकळून चहा तयार करा किंवा रोज सकाळी 4–5 पाने चावून खा.
advertisement
दालचिनी: दालचिनी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि व्हायरल इंफेक्शनपासून संरक्षण करते. पचन सुधारण्यास मदत करते आणि थंडीमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांपासून आराम देते.
उपयोग: चहा, दूध किंवा पाण्यात उकळून सेवन करा.या मसाल्यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास पावसाळ्यात नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. हे उपाय घरबसल्या, सहज आणि सुरक्षितपणे करता येतात. जे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
Monsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी? स्वयंपाकघरातील हे 5 मसाले ठरतील आरोग्यासाठी वरदान, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement