Weight Loss: झटपट कमी करायचंय वजन? हे डायट करा फॉलो, मस्त स्लिम व्हाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिराला जसा व्यायाम आवश्यक आहे. तसाच सकस आहारही अत्यंत महत्त्वाचा आहे. फिट राहण्यासाठी आहाराबाबत काही चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्यायला हव्या.
काजल मनोहर, प्रतिनिधी
सीकर : आजकाल सर्वांनाच स्लिम राहायला आवडतं. परंतु धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्षच देता येत नाही. अनेकजण डायट करतात, मात्र एका काळानंतर डायट मोडून सारंकाही खावंसं वाटतं. म्हणूनच आपली लाइफस्टाइल हेल्थी करणं आवश्यक असतं, असं तज्ज्ञ सांगतात. फिट राहण्यासाठी आहाराबाबत काही चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्यायला हव्या.
योगतज्ज्ञ रोहन बाकोलिया सांगतात की, शरिराला जसा व्यायाम आवश्यक आहे. तसाच सकस आहारही अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यायाम म्हणून आपण जिम, पॉव्हर योगा, ऍरोबिक्स, जॉगिंग, स्विमिंग किंवा सायकलिंग करू शकता, दोरी उड्या मारूनही आपण फिट राहू शकता. तर, आहाराबाबत काय काळजी घ्यावी, पाहूया.
advertisement
भरपूर पाणी, भाज्या आणि रसाळ फळं
शरिरातलं पाण्याचं प्रमाण कमी व्हायला नको. शिवाय दुधी, टोमॅटो, गाजर, मुळा, कांदा, काकडी, कलिंगड, खरबूज, पपई, संत्र, लिची, इत्यादी पाणीदार फळं आणि भाज्या खाव्या. त्यामुळे फॅट लवकर कमी होण्यास मदत मिळते. दिवसभरात 10 ग्लास पाणी प्यावं. ज्यामुळे शरीर स्वच्छ राहतं.
ब्राऊन राइस आणि डाळी
स्लिम, फिट शरिरासाठी ब्राऊन राइस आणि डाळी फायदेशीर ठरतात. यातून कॅलरीज कमी मिळतात, तरी पोट भरलेलं राहतं. डाळ आणि भातात भाज्या घालाव्या, ज्यामुळे चव मिळते आणि शरीर ऊर्जावान राहतं.
advertisement
लिंबू आणि मध
सकाळी लिंबाचा रस आणि मध मिसळून कोमट पाणी प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत मिळते. शिवाय आजारपणही दूर राहतात.
अंड्याचा पांढरा भाग खावा
अंड्यांत भरपूर प्रोटिन्स असतात. त्यामुळे नाश्त्यात अंड्यांच्या पांढऱ्या भागाचा समावेश करावा. यात फॅट्स नसतात. उलट पोटाची चरबी कमी होते.
हे पदार्थ अजिबात खाऊ नये
व्हाइट राइस, मैदा, ब्रेड खाऊ नये. राजमा आणि छोले उकडून सलाडसोबत खाऊ शकता, मात्र जास्त नाही. कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस, तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये. जास्त खारट आणि गोड पदार्थही खाऊ नये.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आहाराबाबत, आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Sikar,Rajasthan
First Published :
July 11, 2024 6:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Weight Loss: झटपट कमी करायचंय वजन? हे डायट करा फॉलो, मस्त स्लिम व्हाल!