हिवाळ्यात गोड खावं का? कोणते पदार्थ टाळावेत? पाहा डॉक्टरांचा सल्ला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे या काळात आहारावर लक्ष देणे गरजेचे असते.
पुणे, 18 डिसेंबर: सध्या हिवाळा सुरु असून या ऋतूत अनेकांना जास्त भूक लागते. तसेच जास्त गोड खाण्याची इच्छाही होते. पण या गोड पदार्थांचा आपल्याला शरीरावर काय परिणाम होतो? तसेच हिवाळ्यात आहार कसा असावा? याविषयीची माहिती पुण्यातील आहारतज्ज्ञ डॉ. अक्षय जैन यांच्याकडून जाणून घेऊया.
हिवाळ्यात आहार कसा असावा?
हिवाळ्यात आपल्याला भूक जास्त लागते. या काळात स्निग्ध आणि गोड पदार्थ आहारात असावेत. आयुर्वेदानुसार या जेवणात तूप असणं फार महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातील इंधन हे जास्त पेटलेले असते. आपल्याला हिवाळ्यात घाम येत नसल्यामुळे शरीरातील गरमी बाहेर पडत नाही. त्यामुळे आपल्याला सतत भूक लागत असते. त्यासाठी जेवण जास्त करावे लागते.
advertisement
गोड पदार्थ किती खावेत?
आपल्याला हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. गोड पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे या काळता गोड पदार्थ खाणे चांगले असते. विशेषत: गोड पदार्थ हे तेल आणि तुपात बनवलेले असतात. त्यामुळेही हिवाळ्यात ते खाणे फायद्याचे असते. थंडीच्या काळात विशेषत: डिंकाचे लाडू खाणे चांगले असते. कोणताही आहार घेताना तो योग्य प्रमाणात घेणे आरोग्यासाठी लाभदायी असते, असे डॉ. अक्षय जैन सांगतात.
advertisement
हे खाणं टाळावं
हिवाळ्यात वात निर्माण करणारे पदार्थ खाऊ नयेत. चणे, हरभरा वटाणे असे पदार्थ शक्यतो टाळावेत. या पदार्थांच्या सेवनाने वात तसेच वृक्षता वाढते. त्यामुळे या पदार्थांऐवजी तेलकट, तुपकट आणि गोड पदार्थ खावेत, असेही डॉ. जैन सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2023 8:49 AM IST