Diabetes Tips : उन्हाळ्यात शुगर लेव्हल का वाढते? डॉक्टरांनी सांगितले ऊन आणि डायबिटीजमधले कनेक्शन

Last Updated:

उन्हाळ्यातही मधुमेहींनी आपली योग्य काळजी घ्यावी. या ऋतूमध्ये अति उष्णतेमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी.

News18
News18
मुंबई : डायबिटीजच्या रुग्णानं तशी तर सर्वच ऋतूंमध्ये आपली काळजी घ्यावी लागते. कारण छोटीशी चूकही त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यातही मधुमेहींनी आपली योग्य काळजी घ्यावी. या ऋतूमध्ये अति उष्णतेमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी. नाहीतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते, अति उष्णतेचा तुमच्या मधुमेह व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात जास्त घराबाहेर पडू नये. उन्हात बाहेर जाणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. नवी दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांनी सांगितले की, उष्ण हवामानाचा मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
advertisement
या ऋतूमध्ये डिहायड्रेशनचा धोका असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हे टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यावे. इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेही रूग्णांचे निर्जलीकरण झाल्यास, इंजेक्ट केलेले इन्सुलिन शोषून घेण्याची त्यांच्या शरीराची क्षमता कमी होते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे आणि डिहायड्रेशन होऊ देऊ नये.
advertisement
उन्हाळ्याच्या हंगामात मधुमेहाच्या रुग्णांनी डिहायड्रेशन टाळण्याची नितांत गरज असल्याचे डॉक्टर रावत सांगतात. अशा लोकांनी जास्त वेळ उन्हात राहू नये आणि सकाळी व्यायाम करावा. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून रक्तातील साखर नियंत्रित करता येते. याशिवाय ज्या रुग्णांना अनेक प्रयत्नांनंतरही साखर नियंत्रणात अडचण येत असेल, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.
advertisement
विशेषत: जे लोक इन्सुलिन घेतात किंवा त्यांना डायबेटिक न्यूरोपॅथीची समस्या आहे, त्यांनी या हवामानाबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा त्यांची प्रकृती बिघडू शकते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेचे दररोज योग्य निरीक्षण केले पाहिजे, जेणेकरून ती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes Tips : उन्हाळ्यात शुगर लेव्हल का वाढते? डॉक्टरांनी सांगितले ऊन आणि डायबिटीजमधले कनेक्शन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement