छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - हे शहर ऐतिहासिक असून, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांसारख्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
Congress On Alliance With Raj Thackeray MNS : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरला (चिकलठाणा विमानतळ) मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि पुण्याहून नियमित विमानसेवा आहे. विमानतळावरून शहरात जाण्यासाठी टॅक्सी आणि बसची सोय आहे.
शहरात फिरण्यासाठी रिक्षा, सायकल-रिक्षा, शहर बस आणि कॅबचा वापर केला जातो.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन मुंबई, पुणे, हैदराबाद, मनमाड आणि नागपूरला जोडलेले आहे. 'देवगिरी एक्सप्रेस' आणि 'अजिंठा एक्सप्रेस' सारख्या गाड्या इथे येण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पुण्याहून सुमारे 330 किलोमीटर आणि मुंबईहून सुमारे ३७० किलोमीटरवर हे शहर आहे. पुणे आणि मुंबईहून NH 52 आणि NH 160 ने इथे पोहोचता येते. 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या' (MSRTC) आणि खासगी बसेस महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून इथे नेहमी येतात-जातात.