Gopichand Padalkar : 'शरद पवारांना गावोगावची नावं तोंडपाठ, पण त्या दोघांची आठवत नाहीत', गोपिचंद पडळकरांचा पुन्हा वार
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:ASIF MURSAL
Last Updated:
Gopichand Padalkar On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपरोधिक टीका केली आहे.
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपरोधिक टीका केली आहे. वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील बिरोबा मंदिर उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी पवारांना लक्ष्य केले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील बिरोबा मंदिर उदघाटन कार्यक्रमात पडळकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना शरद पवार यांना लक्ष्य केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मतदानाच्या कथित हेराफेरीवरून मोठा गौप्यस्फोट केला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन जण माझ्याकडे आले होते. आम्ही तुमचे 160 आमदार निवडून देऊ असा दावा केला होता. त्या दोघांची नावे आठवत नसल्याचे पवारांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली होती.
advertisement
या वक्तव्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “पवार साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सर्व लोकांची नावं आठवतात. पण जे दोन लोक त्यांच्याकडे जाऊन 160 आमदार आणून देण्याचा दावा करतात, त्यांची नावं मात्र पवार विसरले, असे म्हणत पडखळकरांनी पुन्हा त्यांना लक्ष्य केले.
शरद पवारांविरोधात पडळकर यांची टीका ही नवी नाही. पूर्वीपासूनच त्यांनी पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकांवर सवाल उपस्थित केले आहेत. मात्र, यावेळी पवारांच्या वक्तव्यावर विनोदी शैलीचा आधार देत पडळकरांनी त्यांना टोला लगावला.
advertisement
पडळकरांसाठी सदाभाऊंच्या डोळ्यात पाणी
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू आले. एका कार्यक्रमात गोपिचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना सदाभाऊ अचानक भावूक झाले. आपण शेवटपर्यंत गोपिचंद पडळकरांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले. बिरोबा मंदिर सभा मंडप उद्घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
advertisement
सदाभाऊ खोत आपल्या भाषणात म्हणाले की, मी आणि गोपीचंद पडळकर सर्व जातीला घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढलो. विरोधकांना आमच्याबद्दल राग आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. पण शेवटच्या क्षणापर्यंत आणि माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन. असे सांगत आमदार सदाभाऊ खोत यांना भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
August 26, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gopichand Padalkar : 'शरद पवारांना गावोगावची नावं तोंडपाठ, पण त्या दोघांची आठवत नाहीत', गोपिचंद पडळकरांचा पुन्हा वार


