मुंबईत चहा, चार तासांनी ब्रेकफास्ट लातूर आणि लंच मध्ये हैदराबादी बिर्याणी

Last Updated:

लातूर-कल्याण 'जनकल्याण' द्रुतगती मार्गामुळे ४४२ किमीचा प्रवास फक्त ५ तासांत; देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार.

News18
News18
१२ तासांची थकवणारी, कंबर तोडणारी लातूर-मुंबईची वाट आता कायमची विसरा! कारण मराठवाड्याच्या विकासाला अभूतपूर्व गती देणारा आणि ४४२ किलोमीटरचा हा प्रवास केवळ ५ तासांत पूर्ण करणारा महत्त्वाकांक्षी 'जनकल्याण' द्रुतगती मार्ग मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे, मराठवाडा थेट देशाच्या आर्थिक राजधानीशी 'सुस्साट' वेगाने जोडला जाणार आहे. ट्रेन किंवा बसने प्रवास केला तर किमान 12 ते 14 तास प्रवास करावा लागत होता. आता तोच पाच तासांवर येणार आहे.
सकाळी मुंबईत आरामात चहा घ्यायचा, तिथून ४ तासांनी लातूर गाठून मस्त गरमागरम नाश्ता करायचा आणि दुपारच्या जेवणात थेट हैदराबादी बिर्याणी खाऊन परत यायचं. 'इन्फ्रा मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या दूरदृष्टीमुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने 'सुस्साट' गती मिळणार आहे.
advertisement
मराठवाड्याच्या विकासाला अभूतपूर्व गती देणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर-कल्याण 'जनकल्याण' द्रुतगती मार्गाची घोषणा केली आहे. 'इन्फ्रा मॅन' अशी ख्याती असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे, लातूर ते मुंबई हा दीर्घकाळचा प्रवास आता अवघ्या पाच तासांत पूर्ण होणार आहे. हा द्रुतगती मार्ग मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला एक मोठी चालना देणार आहे.
advertisement
४४२ किलोमीटरचा महामार्ग आणि ३५ हजार कोटींचा खर्च
या मार्गासाठी औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि मुंब्राड विधानसभेचे आमदार विसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पात एक महत्त्वपूर्ण बदल समाविष्ट करण्यात आला आहे. लातूर-अहिराळा-माळशेज घाट मार्गे बडोदा एक्सप्रेस-वे वरील बोरघाटातून पनवेल-जेएनपीटीपर्यंत थेट जोडणी केली जाणार आहे. लातूर-कल्याण 'जनकल्याण' द्रुतगती महामार्ग हा एकूण ४४२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) केली जाणार आहे. सध्या या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) लवकरच तयार करण्याचे काम सुरू होणार आहे.
advertisement
हा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर लातूर, अहमदनगर, पुणे, नांदेड या शहरांसह मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचेलच, पण त्यासोबतच मालवाहतूक, उद्योग आणि रोजगार निर्मिती यांना मोठी चालना मिळणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे मराठवाडा थेट देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडला जाईल, ज्यामुळे या भागातील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत चहा, चार तासांनी ब्रेकफास्ट लातूर आणि लंच मध्ये हैदराबादी बिर्याणी
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement