वडिलोपार्जित शेती विकून 1 कोटी गुंतवले, पतसंस्थेनं लुबाडलं, 5 कोटींचा घोटाळा उघड

Last Updated:

विघ्नहर मल्टीस्टेट पतसंस्थेने जास्त व्याजाचं आमिष दाखवून 50 ठेवीदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक केली, संचालकांवर गुन्हा दाखल, शेख तौफिक यांनी फिर्याद दिली.

News18
News18
ज्यादा व्याजदराच्या आमिषाने मती फिरली आणि वडिलोपार्जित जमीन विकून पतसंस्थेत 1 कोटी रुपये जास्त व्याजदर मिळवण्यासाठी ठेवले. मात्र हीच चूक भोवली आणि होत्याचं नव्हतं झालं. सगळे पैसे गेले. हा पहिलाच माणूस नाही तर असे 50 जण फसले आहेत. जास्त व्याजाचं आमिष दाखवून 5 कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. विघ्नहर मल्टीस्टेट पतसंस्थेतील घोटाळा समोर आला. त्यानंतर अनेक गरजू लोकांचं मोठं नुकसान झालं.
मुदतीपूर्वी निकड असल्याने १ कोटी रुपये शेख तौफिक काढायला गेले. तेव्हा वारंवार त्यांना मॅनेजर सध्या नाही असं सांगण्यात आलं. मॅनेजरने अध्यक्षांना कॅन्सर झाल्याने पैसे देण्यात नकार देण्यात आला. अध्यक्ष देशमुख यांना त्यांनी फोन केल्यावर त्यांनी उचलला नाही. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. 50 ठेवीदारांचं मोठं नुकसान झालं आहे. 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विघ्नहर मल्टीस्टेट पतसंस्थेवर आहे.
advertisement
2023 ते 2025 दरम्यान खिंवसरा पार्क इथल्या संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला. याआधी व्यावसायिकांची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी संस्थेचे संचालक डॉ. क्याटमवार विरसिंह, आर. जी बाहेती, अध्यक्ष मृत मथुरादास देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख तौफिक आणि मोहम्मद शफी यांनी फिर्याद दिली होती. त्याच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
९३ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2 लाख ५ हजार रुपये ९१ दिवसांसाठी ठेवलं मुदत म्हणून ठेवलं तर 2 लाख 8 हजार ८०० रुपये व्याज मिळेल असं आमिष दाखवण्यात आलं होतं. शेख तौफिक यांची मुदत 1 जुलै 2025 मध्ये ही रक्कम मॅच्युअर होणार होती. याआधी देखील त्यांनी असे पैसे गुंतवले होते, आता गरज असल्याने जेव्हा पतसंस्थेत पैसे काढायला गेला तेव्हा त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. वेगवेगळी कारण देण्यात आली. फिर्यादीनं न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं आणि हा धक्कादायक प्रकार घडकीस आला. आता खातेधारकांना पैसे दिले जात नसल्याने त्यांच्या कष्टायचे पैसे अडकले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वडिलोपार्जित शेती विकून 1 कोटी गुंतवले, पतसंस्थेनं लुबाडलं, 5 कोटींचा घोटाळा उघड
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंमत किती?
चांदीत ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंम
  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

View All
advertisement