Firing News: महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार, मुंबईजवळ घडली थरारक घटना

Last Updated:

महाराष्टात एकामागून एक गोळीबाराची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच मुंबईजवळ एक गोळीबाराचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणानं खळबळ उडाली असून पुन्हा एकदा दहशत पहायला मिळाली.

महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार
महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार
प्रमोद पाटील, पनवेल: महाराष्टात एकामागून एक गोळीबाराची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच मुंबईजवळ एक गोळीबाराचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणानं खळबळ उडाली असून पुन्हा एकदा दहशत पहायला मिळाली. पनवेलमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय.
पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या गोळीबार प्रकरणी राहूल पाटील याच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 12 तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेवटची लढत ही कल्याण मधील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली. अंतिम लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला. जिंकलेल्या गटाने आनंदात गुलालाची उधळण केली. मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला.
advertisement
राहुल पाटील याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला. दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली. त्यात राहुल पाटील यांनी त्याच्या सोबत जमवलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूल मधून एक राऊंड फायर केला. घटनास्थळी पोलिसांनी तपासली केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं.
advertisement
पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर 15 ते 20 जणांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 336,294,141 व इतर कलामसह गुन्हा दाखल झाला असून,पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/मुंबई/
Firing News: महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार, मुंबईजवळ घडली थरारक घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement