Dast Nondani : मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, दस्त नोंदणी संदर्भात घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Maharashtra government simplifies document registration process : महसूल विभागाने दस्त नोंदणी प्रक्रिया सोपी केली आहे. आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयातून दस्त नोंदणी करता येईल. वेळ वाचेल तसेच कामकाज जलद होईल.

News18
News18
मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी दस्त नोंदणीसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात लोक आपली दस्त नोंदणी करू शकतील. यासाठी आधी असलेली क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने या सुधारणेबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला असून यामुळे नागरिकांचा वेळ आणि धावपळ दोन्ही वाचेल. तसेच म्हणजे कार्यालयीन कामकाज आणि निर्णय प्रक्रियाही जलद होईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या क्षेत्रीय अटी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहे.
दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ
मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक, कंपनी मालक आता त्यांच्या मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र यासह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी त्यांच्या क्षेत्रासंबंधित कार्यालयापुरती मर्यादित न राहता मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयात करू शकतील. या सहा कार्यालयांमध्ये बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज नाही आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
advertisement
या सहा कार्यालयांमध्ये बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज नाही आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
या निर्णयामुळे व्यवसायिक आणि कंपनी मालकांसह घरकुलधारकांचेही कामकाज सुलभ होईल. पूर्वी नागरिकांना केवळ त्यांच्या स्थानिक मुद्रांक कार्यालयात जावे लागत असे जे अनेकदा वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत असे. आता ही अट रद्द झाल्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक लवचिक आणि सोपी झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dast Nondani : मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, दस्त नोंदणी संदर्भात घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement