पुरीतील श्री गुंडिचा मंदिरात चेंगराचेंगरी, जगन्नाथाच्या रथाचं दर्शन घेताना तीन भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

Last Updated:

ओडिशातील पुरी येथील श्री गुंडीचा मंदिर परिसरात मोठी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
ओडिशातील पुरी येथील श्री गुंडीचा मंदिर परिसरात मोठी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. भगवान जगन्नाथाच्या रथाला स्पर्श करण्यासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक भाविक जखमी झाल्याचं कळत आहे. रविवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. घटनास्थळी कोणतीही रुग्णवाहिका नव्हती. अशा परिस्थितीत लोकांनी स्वतः जखमींना उचलून रुग्णालयात नेले. मात्र, आता तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात आली आहे.
पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नंदीघोष रथासमोर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले. त्यामुळे घटनास्थळी ढकलाढकली झाली, यावेळी रथाच्या चाकांजवळ अनेक भाविक एकमेकांवर पडले.
या दुर्घटनेत आतापर्यंत तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बसंती साहू, प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहे.
advertisement
बसंती साहू या खोर्डा जिल्ह्यातील बोलागड येथील रहिवासी आहेत. तर प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास हे बालियांता ब्लॉकमधील अथंतरा गावातील रहिवासी आहेत.तिन्ही मृतदेह पुरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/देश/
पुरीतील श्री गुंडिचा मंदिरात चेंगराचेंगरी, जगन्नाथाच्या रथाचं दर्शन घेताना तीन भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement