चिकन की मटण, आरोग्यासाठी सर्वोत्तम काय? कशातून मिळते जास्त ताकद?

Last Updated:
चिकन किंवा मटणाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मांसाहारप्रेमींना भूक लागते. अनेकजणांना चिकन, मटण दोन्ही आवडतं, तर काहीजण फक्त चिकन आवडीनं खातात आणि काहीजण फक्त मटण मिटक्या मारत खातात. या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात पण आरोग्यासाठी जास्त पौष्टिक काय असतं याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 
1/5
चिकन, मटणाचे विविध पदार्थ आपण आवडीनं खातो. सुरूवात होते सूपपासून. चिकनचं किंवा मटणाचं सूप प्यायल्यास आजारपण अगदी पळून जातं आणि थकवाही ओसरतो, असं म्हणतात.

advertisement
2/5
मटणाच्या नळ्या खूप भक्कम असतात, परंतु आरोग्यासाठी मात्र चिकन जास्त पौष्टिक असतं, असं तज्ज्ञ सांगतात. तसंच बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन आरोग्यासाठी फायदेशीर असतं, त्यातून भरपूर पोषक तत्त्व मिळतात, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

3/5
तज्ज्ञ म्हणाले, मटणामुळे शरिरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. तसंच चिकन खाण्यापूर्वी त्यातले फॅट पूर्णपणे काढलेले असायला हवे. चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. त्यात जास्त मसाले वापरू नये. चिकन नुसतं उकडवून खाल्लं किंवा त्याचा सूप प्यायला तरी भरपूर पोषक तत्त्व मिळतात.

4/5
दररोज 50 ग्रॅम जरी चिकन खाल्लं तरी ते शरिरासाठी फायद्याचं ठरतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं. तसंच तुम्ही शाकाहारप्रेमी असाल तर आहारात चिकनचा आवर्जून समावेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

5/5
तज्ज्ञांनी असंही सांगितलं की, आजारी व्यक्तीला चिकन देण्यापेक्षा मटणापासून तयार होणारं पाया सूप दिलं तर उत्तम, त्यामुळे लवकर आराम मिळण्यास मदत मिळते. 

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement