गुड न्यूज मिळत नाही? किचनमधला 'हा' मसाला करेल शुक्राणू Strong

Last Updated:
किचनमधला सर्वात सुगंधित मसाला म्हणजे वेलची. जी औषधी गुणांनी परिपूर्ण असते. वेलची आरोग्यासाठीही प्रचंड फायदेशीर आहे. दिसायला जरी लहानशी दिसत असली तरी ती मोठमोठ्या आजारांवर भारी पडते. (सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी)
1/5
गोड पदार्थांची चव वाढवणारी वेलची हा भारतीय स्वयंपाकघरातला सुप्रसिद्ध मसाला आहे. अगदी उन्हाळ्यात शरिराला गारवा मिळवून देण्यासाठीही ती उपयुक्त असते. खरंतर घरच्या जेवणातून आपल्या पोटात जाणारा प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

advertisement
2/5
डॉ. प्रियंका सिंह सांगतात की, उचकी लागणं, तोंडातून दुर्गंधी येणं, पचनसंस्था बिघडणं, सर्दी-खोकला, रक्तदाब, दमा, अति भूक लागणं, अतिसार, शुक्राणूंची कमतरता, लघवीसंबंधित आजार, दातांचे आजार, इत्यादींवर वेलची रामबाण असते.

3/5
वेलची, आलं आणि पुदिन्याची पानं एका सुती कापडात बांधून त्याचा सुगंध घेतल्याने मळमळ आणि उलटीवर आराम मिळतो. शिवाय वेलचीचं दूध प्यायल्यास तणाव फार कमी होतो.

4/5
 वेलचीत कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कार्बोहायड्रेट, डायटरी  आणि फॉस्फरससह अनेक  भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच वेलची  असते. 
वेलचीत कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कार्बोहायड्रेट, डायटरी फायबर आणि फॉस्फरससह अनेक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच वेलची आरोग्यदायी असते. 
advertisement
5/5
लक्षात घ्या, कोणताही मसाला कितीही औषधी गुणांनी परिपूर्ण असला, तरी कोणत्याही पदार्थाचा अतिवापर हा नुकसानदायक ठरू शकतो. त्यामुळे वेलचीचाही औषधी वापर करण्यापूर्वी एकदा स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल. 

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement