Indian Railways: जनरल कोच संदर्भात भारतीय रेल्वेचा नवीन नियम, काउंटरवर ठराविक लोकांना मिळणार तिकीट, कसं आणि कोणाला मिळणार?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian Railways 2025 : जनरल डब्यांपासून थेट थर्ड एसीपर्यंत अनेक जण आपल्या बजेटनुसार तिकीट काढून प्रवास करतात. पण सध्या रेल्वेच्या प्रवासात काही मोठे बदल होणार आहेत.
भारतात लाखो सामान्य नागरिक रोजच्या जीवनात रेल्वेचा वापर करत असतात. ऑफिसला जाणं, गावाला जाणं, किंवा कुठे तरी फिरायला जाणं. अशा सगळ्या गरजे वेळी रेल्वे हेच सर्वसामान्यांचं सगळ्यात सोयीचं, स्वस्त आणि भरवशाचं माध्यम ठरतं. जनरल डब्यांपासून थेट थर्ड एसीपर्यंत अनेक जण आपल्या बजेटनुसार तिकीट काढून प्रवास करतात. पण सध्या रेल्वेच्या प्रवासात काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल थेट प्रवाशांच्या सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत आणि जनरल डब्यांमधील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आहेत.
advertisement
भारतीय रेल्वेने नुकतेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सर्व ट्रेन इंजिन आणि डब्यांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, एकूण 15,000 इंजिन्स आणि 74,000 डब्यांमध्ये हे अत्याधुनिक कॅमेरे बसवले जातील. प्रत्येक इंजिनमध्ये 6 कॅमेरे असतील आणि ते कमी प्रकाशात, तसेच ताशी 100 किमी वेगाने ट्रेन चालू असतानाही स्पष्ट दृश्य देतील. गोपनीयतेची काळजी घेत ही यंत्रणा राबवली जाणार आहे.
advertisement
advertisement
सध्या एका जनरल डब्यात 300 ते 400 प्रवासी चढतात. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एका जनरल डब्यासाठी फक्त 150 तिकीट दिली जातील. यासाठी एक खास सॉफ्टवेअर वापरलं जातंय, जे पुढील 3 तासांत सुटणाऱ्या ट्रेनची संख्या आणि प्रत्येक ट्रेनमधील जनरल डब्यांची गणना करून त्याचप्रमाणे तिकीटांची मर्यादा निश्चित करेल.
advertisement
advertisement
advertisement