'माहेरी निघून जा, नाहीतर...', पुण्यातील नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची धमकी, बायकोची पोलिसात धाव

Last Updated:

काही दिवसांनी या विवाहितेला तिचा पती अमोल याचे दामिनी नावाच्या २७ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली.

नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध (Canva Image)
नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध (Canva Image)
affaपुणे: एका ३० वर्षीय विवाहितेला पतीने आणि सासरच्या मंडळींनी छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात तिचं सासर तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात माहेर आहे. लग्नाच्या सुरुवातीला चांगली वागणूक मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी पतीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पतीने केलेल्या छळापेक्षाही, त्याच्या प्रेयसीने विवाहितेला दिलेली थेट धमकी या प्रकरणात अधिक खळबळजनक ठरली आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात पती, त्याची प्रेयसी आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीचा विवाह पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणाऱ्या अमोल नावाच्या तरुणाशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. सुरुवातीचे सहा महिने सर्व काही सुरळीत होतं. मात्र त्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू झालं. काही दिवसांनी या विवाहितेला तिचा पती अमोल याचे दामिनी नावाच्या २७ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तिने याबाबत पतीला विचारणा केली असता, पतीने उलट पत्नीलाच त्रास देणं सुरू केलं.
advertisement
पतीचे प्रेमसंबंध असलेल्या दामिनी नामक तरुणीने विवाहितेच्या सुखी संसारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. तिने अमोलकडे 'पत्नीला घटस्फोट दे' अशी मागणी वारंवार केली. यानंतर तिने थेट विवाहितेलाच धमकी दिली. "तू अमोलला सोडचिठ्ठी देऊन तुझ्या माहेरी निघून जा. नाही गेलीस तर तुला पाहून घेईल," अशी धमकी दामिनीने दिल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. इतकंच नव्हे, तर सासू-सासऱ्यांनीही "तू चांगली नाहीस, तुला बाहेर फिरायला पाहिजे" असं म्हणत आपल्याशी वाद घातला, असंही विवाहितेनं म्हटलं आहे.
advertisement
सासरकडील छळ असह्य झाल्यामुळे विवाहिता माहेरी परतली. मात्र, पतीने तिचा पाठलाग सोडला नाही. पतीने विवाहितेला स्पष्ट सांगितलं की, "माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येशील तेव्हाच घरी परत ये, अन्यथा येऊ नकोस." दरम्यान, तिचा पती अमोल हा सोनगाव येथे आला आणि त्याने थेट तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत "मला तुमच्या मुलीला नांदवायचे नाही, मला घटस्फोट पाहिजे," असे धमकावले. या सर्व त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेने चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी पीडितेचा पती अमोल आणि त्याची प्रेयसी दामिनी यांच्यासह सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक छळ आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'माहेरी निघून जा, नाहीतर...', पुण्यातील नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची धमकी, बायकोची पोलिसात धाव
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement