World Cup : मॅच नव्हती तरी, श्वास रोखून बसली होती हरमनप्रीत, हार्टब्रेक दिला तिनेच टीम इंडियाला दिली गूड न्यूज!

Last Updated:

महिला वर्ल्ड कपमध्ये रविवारी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धक्कादायक पराभव झाला, पण या पराभवाच्या 24 तासांमध्येच टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.

मॅच नव्हती तरी, श्वास रोखून बसली होती हरमनप्रीत, हार्टब्रेक दिला तिनेच टीम इंडियाला दिली गूड न्यूज!
मॅच नव्हती तरी, श्वास रोखून बसली होती हरमनप्रीत, हार्टब्रेक दिला तिनेच टीम इंडियाला दिली गूड न्यूज!
विशाखापट्टमण : महिला वर्ल्ड कपमध्ये रविवारी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धक्कादायक पराभव झाला, पण या पराभवाच्या 24 तासांमध्येच टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटने विजय झाला आहे, त्यामुळे सेमी फायनलच्या रेसमध्ये बांगलादेशची टीम अडचणीत आली आहे, ज्याचा टीम इंडियाला पुढे फायदा होऊ शकतो.
बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेचे 4 सामन्यांमध्ये 3 विजयांसह 6 पॉईंट्स आहेत. तर 4 सामन्यात 3 विजयांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 7 पॉईंट्स आहेत. 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवलेली इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने 4 सामन्यात 1 विजय मिळवला आहे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय झाला असता, तर बांगलादेशनेही सेमी फायनलच्या रेसमध्ये ट्रॅफिक जॅम केला असता.
advertisement

हार्टब्रेक दिला तिनेच गूड न्यूज दिली

दक्षिण आफ्रिकेची नदिने डे क्लार्कने मागच्या सामन्यात टीम इंडियाचा हार्टब्रेक केला होता. नदिने डे क्लार्कने भारताविरुद्ध 54 बॉलमध्ये 84 रनची वादळी खेळी करून विजय खेचून आणला. आता बांगलादेशविरुद्ध नदिने डे क्लार्कने 29 बॉलमध्ये नाबाद 37 रन करून दक्षिण आफ्रिकेला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आणि आणखी एक विजय मिळवून दिला. बांगलादेशने दिलेल्या 233 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था 78/5 आणि 163/6 अशी झाली होती, पण नदिने डे क्लार्कने झुंजार खेळी केली. क्लार्कशिवाय चोलाई ट्रायनने 62 आणि मरिझेन कॅपने 56 रनची खेळी केली. बांगालदेशकडून नहिदा अक्तरने 2 विकेट घेतल्या, तर राबिया खान, फहिमा खातून आणि रितू मोनीला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 232 रन केले. शोरना अक्तरने 51 रनची खेळी केली. तर शरमीन अख्तरने 50 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून मलाबाला 2 विकेट मिळाल्या, तर नदिने डे क्लार्क आणि ट्रायनला 1-1 विकेट मिळाली.

इंडिया-न्यूझीलंडमध्ये रेस

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीनही टीम सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या तगड्या दावेदार झाल्या आहेत. तर चौथ्या टीमसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा आहे. भारताचे उरलेले 3 सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध आहे. तर न्यूझीलंडचे सामने श्रीलंका, पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडविरुद्ध आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : मॅच नव्हती तरी, श्वास रोखून बसली होती हरमनप्रीत, हार्टब्रेक दिला तिनेच टीम इंडियाला दिली गूड न्यूज!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement