Indian Railway : तिकिट बुकिंगवर 20 टक्के डिस्काउंट, काय आहे रेल्वेची 'राउंड ट्रिप पॅकेज' स्कीम? वाचा संपूर्ण अटी-शर्ती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रेल्वेने नवीन ऑफर आणली आहे आणि सीझनच्या आधी प्रवाशांची चांगलीच बचत होणार आहे. मात्र ही योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याने काही अटी पाळणं गरजेचं आहे.
आता ट्रेनच्या तिकिटांवर तब्बल 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. मोठे असोत की लहान, ज्येष्ठ नागरिक असोत की तरुण—रेल्वेच्या या ऑफरचा लाभ सर्व प्रवाशांना घेता येणार आहे. याआधी वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा काही प्रवाशांना तिकिटावर सूट मिळायची, मात्र कोविड काळात त्या सर्व योजना बंद करण्यात आल्या होत्या.

आता पुन्हा रेल्वेने नवीन ऑफर आणली आहे आणि सीझनच्या आधी प्रवाशांची चांगलीच बचत होणार आहे. मात्र ही योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याने काही अटी पाळणं गरजेचं आहे.
advertisement

20% डिस्काउंटची ऑफर काय आहे?
advertisement
रेल्वेच्या या योजनेला ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत जर आपण ये-जा (जाण्याचा आणि परतीचा) प्रवासाचे तिकिट एकत्र बुक केलं, तर एकूण रकमेत 20 टक्क्यांची सूट मिळेल.

योजना कधीपासून सुरु झाली?
advertisement
‘राउंड ट्रिप पॅकेज’ अंतर्गत तिकिट बुकिंग 14 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. ही योजना सध्या प्रायोगिक स्वरूपात सुरू आहे. फीडबॅक चांगला मिळाल्यास हळूहळू ती देशभर कायमस्वरूपी लागू होऊ शकते.

योजना कधीपर्यंत लागू राहणार?
advertisement
या स्कीम अंतर्गत प्रवासाची तारीख जाण्याची 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आणि परतीचा प्रवास 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान असावा.

20% डिस्काउंटसाठी अटी:
advertisement
दोन्ही तिकिटांवरील प्रवाशाचे नाव एकच असावे. जाण्याचं आणि येण्याचं दोन्ही तिकिट कन्फर्म असणे आवश्यक. तिकिट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.
तिकिटांची बुकिंग एकाच वेळी आणि एकाच माध्यमातून करावी (IRCTC वेबसाइट/ॲप किंवा रेल्वेच्या तिकीट खिडकीवरून).
या ऑफरवर इतर कोणतेही सवलतीचे स्कीम लागू होणार नाहीत.
या ऑफरअंतर्गत बुक झालेल्या तिकिटांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : तिकिट बुकिंगवर 20 टक्के डिस्काउंट, काय आहे रेल्वेची 'राउंड ट्रिप पॅकेज' स्कीम? वाचा संपूर्ण अटी-शर्ती