Indian Railway : 90% प्रवाशांना माहितीच नाही रेल्वेचा हा नियम; तुम्हाला माहित आहे का?

Last Updated:

हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचं जाळं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असल्यामुळे कोणत्याही भागात प्रवास करणं रेल्वेनं सोपं जातं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय रेल्वेनं बहुतांश लोक प्रवास करतात. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचं जाळं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असल्यामुळे कोणत्याही भागात प्रवास करणं रेल्वेनं सोपं जातं. भारतीय रेल्वेने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक नियम लागू केले आहेत. लाखो लोक रोज स्लीपर आणि एसी कोचमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करतात आणि प्रवासादरम्यान अखंड झोप मिळणे महत्त्वाचे असते.
या प्रवासादरम्यान जर वारंवार तिकीट तपासणीमुळे झोपेमध्ये व्यत्यय आला, तर प्रवासाचा आनंद कमी होतो, तसेच लोकांची चिडचिड होते, त्यामुळेच रेल्वेने एक विशेष नियम लागू केला आहे, जो रात्री तिकीट तपासणीसंदर्भात आहे. हा नियम अनेक प्रवाशांना माहितही नाही.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, रात्री 10 वाजल्यानंतर आणि सकाळी 6 वाजेपूर्वी सामान्य परिस्थितीत तिकीट तपासणी केली जात नाही. हा नियम स्लीपर आणि एसी दोन्ही प्रकारच्या कोचसाठी लागू आहे. म्हणजेच, जर आपण आपल्या सीटवर आधीपासून बसलेले असाल आणि तिकीट तपासले गेले असेल, तर रात्री कोणीही आपल्याला त्रास देणार नाही.
advertisement
कधी लागू होत नाही हा नियम?
जर आपण प्रवासाच्या मधल्या टप्प्यात ट्रेनमध्ये चढलात, तर टीटीईला तिकीट तपासण्याचा अधिकार असतो. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तिकीट तपासणी होऊ शकते. पण आधीपासून बसलेल्या प्रवाशांना फक्त तिकीट तपासण्यासाठी उठवणे हा नियम मोडणारा प्रकार आहे.
जर टीटीई रात्री 10 नंतर विनाकारण त्रास देत असेल, तर आपण रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 वर तक्रार नोंदवू शकता. रेल्वे प्रशासन अशा तक्रारींवर कार्यवाही करते.
advertisement
रात्री जोरात बोलणे, मोठ्याने म्यूजिक किंवा व्हिडिओ लावणे, कोचची मुख्य लाईट बंद करणे, फक्त डिम लाईट सुरू ठेवणे, आणि रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंट बंद ठेवणे हे नियमही लागू असतात, जे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी आहेत.
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : 90% प्रवाशांना माहितीच नाही रेल्वेचा हा नियम; तुम्हाला माहित आहे का?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement