पोहता पोहता अचानक गायब झाली महिला, ना बुडाली, ना पाण्याबाहेर आली; धक्कादायक सत्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
ती पोहोता पोहोता पाण्यातच अचानक गायब झाली. ती बुडाली नव्हती, ती पाण्याबाहेरसुद्धा आली नाही, मग गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला. पाण्यात अचानक गायब होण्याबाबतचं सत्य दुसऱ्यादिवशी समोर आलं आणि सर्वांना धक्काच बसला.
कॅनबेरा : पाण्यात बुडाल्याची बरीच प्रकरणं आहेत. पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्याने अशा घटना घडतात. पण एक महिला जी जलतरणपटू आहे, साहजिकच ती चांगली स्विमर आहे, ती पोहोता पोहोता पाण्यातच अचानक गायब झाली. ती बुडाली नव्हती, ती पाण्याबाहेरसुद्धा आली नाही, मग गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला. पाण्यात अचानक गायब होण्याबाबतचं सत्य दुसऱ्यादिवशी समोर आलं आणि सर्वांना धक्काच बसला.
क्रिस्टीन आर्मस्ट्राँग असं या महिलेचं नाव आहे. 63 वर्षांची क्रिस्टीन गतिमंद आहे, ती एक जलतरणपटू आहे. ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत समुद्रात पोहायला गेली होती. पण ती अचानक गायब झाली आणि कुणालाच काही समजलं नाही. दुसऱ्या दिवशी तिचं काही सामान समुद्रकिनाऱ्यावर सापडलं. तेव्हा तिच्या गायब होण्याचं धक्कादायक सत्य समजलं.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
क्रिस्टिनासोबत पाण्यात पोहोणाऱ्या तिच्या मित्रमैत्रिणींना ती आपल्यासोबत नाही याची माहिती तेव्हाच झाली जेव्हा ते सर्वजण पाण्यातून बाहेर किनाऱ्याजवळ आले. त्यांनी क्रिस्टिनाला शोधलं, पण ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर गॉगल आणि स्विमिंग कॅप सापडली.
क्रिस्टिनासोबत काय घडलं?
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीहून दक्षिणेला 200 मैलांपेक्षा जास्त अंतरावर ताथरा घाट आणि ताथरा बीचदरम्यान हे लोक पोहायला गेले होते.
advertisement
पूर्वी हे क्षेत्र लोकप्रिय मासेमारीचं ठिकाण होतं, ज्यामध्ये शार्कची शिकारही होत होती. क्रिस्टिनालाही शार्कनं गिळलं होतं.
ते लोक पोहोत असताना आकाशात एकाच ठिकाणी पक्ष्यांचा थवा आणि पाण्यातून दिसणारं शार्कचे पर त्यांना दिसले. शार्क आल्याचं त्यांना समजलं आणि सर्वांची पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली. सर्वांनी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेनं धाव घेतली. कसेबसे ते पाण्यातून बाहेर किनाऱ्यावर आले. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडत एकमेकांना मिठी मारली. पण त्यांच्यात क्रिस्टिना कुठेच नव्हती. पाण्यातून बाहेर येईपर्यंत क्रिस्टिना आपल्यासोबत नाही याची त्यांना माहितीच नव्हती.
advertisement
तिला शार्कनं गिळल्याचं धक्कादायक सत्य समजलं. स्वतःचा बचाव करण्यासाठी मदत मागण्यासाठी ओरडण्याची संधीही तिला मिळाली नाही, तिच्या नवरा रॉबनं हे सांगितलं. 2014 मध्ये घडलेली ही घटना FIERCE द्वारे एका व्हिडिओमध्ये पुन्हा सांगितली गेली. हा व्हिडीओ युट्युबवरही पोस्ट करण्यात आला आहे.
Location :
Delhi
First Published :
May 20, 2024 8:17 AM IST
मराठी बातम्या/Viral/
पोहता पोहता अचानक गायब झाली महिला, ना बुडाली, ना पाण्याबाहेर आली; धक्कादायक सत्य