तुफानी करायला गेली तरुणी! रेल्वे ट्रॅकवरच पळवली कार, थांबवलं तर स्पीड वाढवला, पुढे घडलं असं...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman drive car on railway track : तरुणीने रेल्वे ट्रॅकवर कार पळवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हैदराबाद : रेल्वे ट्रॅकवर स्टंट केल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. कुणी समोरून ट्रेन येतात ट्रॅकवर उभं राहतं, कुणी ट्रॅकवर काहीतरी वस्तू ठेवतं, अशा काही बातम्या तुम्ही वाचल्या असतील. असे कारनामे शक्यतो तरुण करताना दिसतात. पण आता एका तरुणीने असा कारनामा केला आहे. तिने चक्क रेल्वे ट्रॅकवर कारच पळवली आहे.
तरुणीने रेल्वे ट्रॅकवर कार पळवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार ही घटना तेलंगणातील आहे. नागुलापल्ली आणि शंकरपल्ली दरम्यान महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्यास सुरुवात केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवत राहिली. तिने स्पीडही वाढवला.
🚨SHOCKING #Telangana : A woman was arrested for driving her car on railway track 🛤️ her car in Shankarpally to film a REEL, she was reportedly under the influence of drugs.
The Railway officials tried to stop her but she didn’t stop . Several trains on Hyderabad- Bengaluru… pic.twitter.com/owoBhxZq8U
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) June 26, 2025
advertisement
स्टेशन मास्टरने तात्काळ सतर्कता दाखवली आणि अनेक गाड्या थांबवल्या, ज्यामुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही.
महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार या महिलेने रिल्ससाठी असं केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच ती ड्रग्जच्या नशेत होती अशीही माहिती आहे.
Location :
Telangana
First Published :
June 26, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/Viral/
तुफानी करायला गेली तरुणी! रेल्वे ट्रॅकवरच पळवली कार, थांबवलं तर स्पीड वाढवला, पुढे घडलं असं...