Job Astrology: मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीत मन नाही? हा शेवटचा उपाय कदाचित कामी येईल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Job Astrology: आजच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला चांगली नोकरी मिळावी, अशी इच्छा असते. महागाई प्रचंड असल्यानं स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकेल इतका पैसा मिळण्याची अपेक्षा असते. यासाठीच कित्येक लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. खूप मेहनत करूनही बराच काळ मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रात असे काही मंत्र सांगितले आहेत, सकाळी-संध्याकाळी जप केल्यानं आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. मनासारखी नोकरी किंवा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी कोणते मंत्र जप करावेत ते जाणून घेऊया.
advertisement
1/6

ॐ गं गणपतये नमःश्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. त्यामुळं कोणत्याही स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा अर्ज भरताना हा मंत्र जप करून सुरुवात करावी. मंत्र जप केल्याने आत्मविश्वासही वाढतो. गणपतीच्या आशीर्वादानं तुमची इच्छाही लवकरच पूर्ण होईल.
advertisement
2/6
ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमःग्रहांचा राजा सूर्य हा आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो. सरकारी पदे, प्रशासकीय सेवा (IAS, PCS) किंवा आर्मी-पोलीस सारख्या नोकऱ्यांसाठी इच्छुक तरुणांसाठी या मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
advertisement
3/6
ऊँ ऐं क्लीं श्रीं नमःहा एक अतिशय प्रभावी बीज मंत्र आहे, तो बुधवारी सुरू करणं फायदेशीर ठरतं. यामुळे बुद्धिमत्ता आणि संवादाची शक्ती मिळते, ज्यामुळे मुलाखती आणि परीक्षांमध्ये यश मिळणे शक्य होते. दररोज १०८ वेळा या मंत्राचा जप करा.
advertisement
4/6
ॐ हनुमते नमःमनात भीती असते, अपयशाची भीती असते किंवा भूतकाळातील पराभवाचे दुःख असते तेव्हा हा मंत्र हनुमानाकडून शक्ती आणि धैर्य मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतो. दररोज सकाळी १०८ वेळा या मंत्राचा जप करा.
advertisement
5/6
ॐ शं शनैश्चराय नमः, ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमःशनिदेवाच्या या मंत्रांचा जप केल्यानं नोकरी मिळण्यातील सर्व अडचणी दूर होतील. शनिदेवाच्या आशीर्वादाने अनेक लोक तुमच्या मदतीला येतील.
advertisement
6/6
ॐ ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मी नारायणाय नमःसरकारी नोकरी किंवा मनासारखी नोकरी मिळविण्यासाठी या मंत्राचा जप करणे खूप चांगले मानले जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Job Astrology: मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीत मन नाही? हा शेवटचा उपाय कदाचित कामी येईल