TRENDING:

Shani Margi: 30 वर्षांनी शनिची गुरुच्या राशीत सरळ चाल! या राशींचे अचानक दिवस पालटणार, भाग्याचा काळ

Last Updated:
Shani Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला एका राशी परत येण्यासाठी 30 वर्षे लागतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत शनी संथ गतीने प्रवेश करतात. २९ मार्च रोजी शनिदेवाने स्वतःची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश केलाय. मीन राशीवर गुरु ग्रहाचे अधिराज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि गुरु यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
advertisement
1/6
30 वर्षांनी शनिची गुरुच्या राशीत सरळ चाल! या राशींचे अचानक दिवस पालटणार
जुलैमध्ये शनिदेव वक्री होणार असून वर्षाच्या अखेरीस सरळ चाल करतील. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीची संधी मिळतील. या राशीचे लोक देश आणि परदेशातही प्रवास करू शकतात. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/6
मिथुन - शनिदेवाची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात थेट येणार आहेत. याकाळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो, त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.
advertisement
3/6
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची थेट चाल अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून चौथ्या घरात सरळ जाणार आहेत. त्यामुळे, या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचा आनंद देखील मिळू शकतो. व्यावसायिक जीवनात तुम्हाला यश मिळेल. नवीन व्यवहारातून नफा होईल.
advertisement
4/6
मीन - कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. तसेच, शनिदेव कर्माचे स्वामी आहेत, ते तुमच्या राशीचे १२ वे घर आहे. त्यामुळे, यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तसेच, तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते.
advertisement
5/6
वृषभ - शनिदेवाची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून थेट उत्पन्नाच्या घरात प्रवेश करणार आहेत. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात, जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील, कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.
advertisement
6/6
वृषभ - नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे, आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. या काळात, तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील असेल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Margi: 30 वर्षांनी शनिची गुरुच्या राशीत सरळ चाल! या राशींचे अचानक दिवस पालटणार, भाग्याचा काळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल