Gulabi Movie: मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gulabi marathi movie earns Rs 1 crore before its release : सध्या मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. सिनेमा रिलीज आधीच बक्कळ कमाई करतो हे आतापर्यंत फक्त हिंदी सिनेमात पाहायला मिळालं होतं. पण आता मराठी सिनेमाही त्यात काही कमी नाही. एक मराठी सिनेमाने रिलीजआधीच 1 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
1/7

मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ सिनेमाने नवा इतिहास रचला आहे. 22 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
2/7
या सिनेमाने प्रदर्शानपूर्वीच एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
advertisement
3/7
चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत.
advertisement
4/7
या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
5/7
या सिनेमात अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रृती मराठे, सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.
advertisement
6/7
सिनेमाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणाले, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत.
advertisement
7/7
‘गुलाबी’ या सिनेमा मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास पाहायला मिळणार आहे.प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल अशी खात्री दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gulabi Movie: मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई