Shahrukh Khan : शाहरुखनं बदललं सगळं गणित, टॉम क्रूझही मागे पडला; हॉलीवूड स्टार्स शॉकमध्ये!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shahrukh Khan : जगप्रसिद्ध Esquire मासिकाने नुकतीच प्रसिद्ध केलेली 'जगातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्यांची यादी' शाहरुखने गाजवली असून, त्याचा समावेश थेट टॉप पाच श्रीमंत अभिनेत्यांमध्ये झाला आहे.
advertisement
1/11

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. जगप्रसिद्ध Esquire मासिकाने नुकतीच प्रसिद्ध केलेली 'जगातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्यांची यादी' शाहरुखने गाजवली असून, त्याचा समावेश थेट टॉप पाच श्रीमंत अभिनेत्यांमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत शाहरुख अनेक हॉलीवूड स्टार्सलाही मागे टाकत पुढे झळकला आहे.
advertisement
2/11
शाहरुख खानची अंदाजे एकूण संपत्ती ८७६.५ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ७४०० कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी केवळ अभिनयावर आधारित नाही, तर त्याच्या इतर व्यावसायिक बाबींवरही आधारित आहे.
advertisement
3/11
अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर शाहरुखने त्याच्या उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले आहेत, यात त्याचे प्रॉडक्शन हाऊस Red Chillies Entertainment, कोलकाता नाईट रायडर्ससारखा क्रिकेट फ्रँचायझी संघ आणि देश-विदेशातील भल्यामोठ्या ब्रँड्ससह जाहिरातींचा समावेश आहे.
advertisement
4/11
२०२३ हे वर्ष शाहरुखसाठी विशेष यशाचं ठरलं. त्याच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर २००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या यशामुळे तो पुन्हा एकदा बॉलीवूडमधील सर्वोच्च मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला.
advertisement
5/11
शाहरुख खान केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही बॉलीवूडचं प्रतिनिधित्व करत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची ओळख "द फेस ऑफ बॉलिवूड" म्हणून आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ तो भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे आणि त्याचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देशांमध्येही आहेत. मात्र, शाहरुख खान केवळ एक अभिनेता नाही, तर एक यशस्वी उद्योजक, जागतिक आयकॉन आणि खर्‍या अर्थाने बॉलीवूडचा बादशाह आहे.
advertisement
6/11
Esquire रिपोर्टनुसार जगातील श्रीमंत कलाकारांची टॉप ५ यादी : पहिल्या क्रमांकावर जेरी सीनफेल्ड
advertisement
7/11
दुसऱ्या क्रमांकावर टायलर पेरी
advertisement
8/11
तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन 'द रॉक' जॉन्सन
advertisement
9/11
चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान
advertisement
10/11
पाचव्या क्रमांकावर टॉम क्रूझ
advertisement
11/11
शाहरुख खानच्या वाढत्या संपत्तीचा आणि यशाचा आलेख पाहता, येत्या काळात तो या यादीच्या शीर्षस्थानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shahrukh Khan : शाहरुखनं बदललं सगळं गणित, टॉम क्रूझही मागे पडला; हॉलीवूड स्टार्स शॉकमध्ये!