तुमचं नातं फक्त दिखावा आहे का? जोडीदारात 'हे' 3 सिग्नल्स दिसले, तर प्रेम नाही फक्त प्रेमाचं नाटक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
समोरच्या व्यक्तीचे काही स्पष्ट संकेत असतात, जे लक्षात घेतल्यास ते नातं खरोखरच आहे की नाही, हे ओळखता येतं.
advertisement
1/8

नातं म्हटलं की त्यात प्रेम, विश्वास, इमानेदारी, सन्मान आणि समर्पण या सगळ्यांचा आधार असतो. दोन माणसांमधील नातं जितकं भावना प्रधान असतं, तितकंच ते समजून घेण्याच्या कुवतीवर टिकून असतं. पण काळाबरोबर काही नाती खऱ्या प्रेमावर नाही, तर केवळ दिखावापूर्तेच उरतात.
advertisement
2/8
अशा नात्यांमध्ये एकजण मनापासून गुंतलेला असतो, तर दुसऱ्याला त्या नात्याची किंमतच नसते. त्याला फक्त सोबत राहण्याचा दिखावा करायचा असतो. अशा वेळेस समोरच्या व्यक्तीचे काही स्पष्ट संकेत असतात, जे लक्षात घेतल्यास ते नातं खरोखरच आहे की नाही, हे ओळखता येतं.
advertisement
3/8
चला तर पाहूया, खोटं नातं ओळखण्यासाठी जोडीदाराचे कोणते सिग्नल्स पकडायचे
advertisement
4/8
वेळ नाही म्हणून टाळणेखरं प्रेम करणारा माणूस कितीही व्यस्त असला तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढतोच. पण जर तुमचा पार्टनर प्रत्येक वेळी वेळ न मिळाल्याचं कारण सांगतो. काम आहे, थकवा आहे, मूड नाही असं वारंवार घडत असेल, तर हे मोठं लक्षण आहे की तो तुमच्याशी इमोशनली जोडलेला नाही.
advertisement
5/8
पब्लिकमध्ये टाळतोयप्रेमात असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराला सगळ्यांसमोर स्वीकारायला कमीपणा मानत नाही. पण जर कोणी तुमच्यासोबत बाहेर फिरायला तयार नसेल, तुमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला नकार देत असेल किंवा आपल्या ओळखीच्या लोकांपासून तुमच्या नात्याचं लपवून ठेवत असेल तर हे नातं फक्त दिखावा असण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
भावनिक गुंतवणूक नाहीशारीरिक जवळीक असणं प्रेमात आवश्यक असलं तरी, त्याहूनही महत्त्वाचं असतं भावनिक नातं. जर तुमचा पार्टनर तुमचं बोलणं ऐकत नसेल, तुमच्या अडचणींमध्ये रस घेत नसेल किंवा स्वतःचे सुख-दुःख तुमच्याशी शेअर करत नसेल, तर हे स्पष्ट लक्षण आहे की तो/ती मनापासून प्रेम करत नाही फक्त नात्याचं नाटक सुरू आहे.
advertisement
7/8
शेवटी एवढंच प्रेमात आंधळं न होता आता डोळस राहून प्रेम करण्याची गरज आहे. डोळसपणाने घेतलेले निर्णय तुम्हाला नकली नात्यांपासून वाचवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला भावनिक त्रास देखील कमी होईल.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुमचं नातं फक्त दिखावा आहे का? जोडीदारात 'हे' 3 सिग्नल्स दिसले, तर प्रेम नाही फक्त प्रेमाचं नाटक