Team India : फक्त रोहित-विराट नाही, तर 5 खेळाडूंचं करिअर संकटात, वर्ल्ड कपआधीच होणार The End!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. 2003 नंतर दुसऱ्यांदा आफ्रिकेतल्या देशांमध्ये वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपला 2 वर्ष शिल्लक असतानाच टीम इंडियाच्या 5 दिग्गजांचं करिअर संकटात आहे.
advertisement
1/5

रोहित शर्माचा जन्म 1987 साली झाला, त्यामुळे 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्माचं वय 40 होईल. वयामुळेच बीसीसीआयने रोहितची वनडे कॅप्टन्सी काढून शुभमन गिलकडे दिली. वेळोवेळी रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे. रोहित पुढचा वर्ल्ड कप खेळणार का नाही? हे 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या वनडे सीरिजनंतरच निश्चित होईल.
advertisement
2/5
जगातला सगळ्यात फिट क्रिकेटर असलेल्या विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहे. 2027 पर्यंत विराटही 38-39 वर्षांचा होईल, पण विराटचा फिटनेस 18 वर्षांच्या तरुणालाही लाजवेल. विराटला वनडे क्रिकेट खेळण्याचं मोटिव्हेशन राहिल का नाही? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोहली वर्ल्ड कप खेळणार का नाही? याचं उत्तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळेल.
advertisement
3/5
कागदावर मोहम्मद शमीचा जन्म 1990 चा आहे, पण त्याचा फिटनेस वेगळंच काही सांगतो. शमीचं शरीर आता सर्जरी आणि वर्कलोड मॅनजमेंट झेलू शकत नाहीये. मागच्या काही वर्षांमध्ये शमी बुमराहनंतरचा भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे, पण तो दुखापतीमधून सावरत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झाल्यामुळे शमी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. शमीने वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी टीममध्ये मोहम्मद सिराज आणि हर्षीत राणा सारखे युवा पर्याय आहेत.
advertisement
4/5
रवींद्र जडेजा बॅटिंग-बॉलिंगप्रमाणेच फिल्डिंगमध्येही उत्कृष्ट योगदान देतो. रोहित-विराटप्रमाणेच जडेजानेही टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी जडेजाची निवड झाली नाही, त्याच्याऐवजी निवड समितीने अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरवर विश्वास दाखवला, त्यामुळे 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये जडेजाचं खेळणं कठीण वाटत आहे.
advertisement
5/5
टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत, पण वनडे आणि टी-20 मध्ये पंतला अशी कामगिरी करता आलेली नाही. टी-20 मध्ये संजू सॅमसन निवड समितीची पहिली पसंत आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल आणि ध्रुव जुरेल विकेट कीपर म्हणून टीममध्ये सिलेक्ट झाले आहेत, त्यामुळे ऋषभ पंतचं वनडे वर्ल्ड कप खेळणं सध्या तरी कठीण वाटत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : फक्त रोहित-विराट नाही, तर 5 खेळाडूंचं करिअर संकटात, वर्ल्ड कपआधीच होणार The End!