चाणक्यनीती हा शब्द सध्याच्या काळात बराच वापरला जातो. चाणक्यनीतीतली अनेक उदाहरणं दिली जातात, सोशल मीडियावर त्यातलं बरंच काही फॉरवर्ड होत असतं. हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेले आर्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांनी दिलेली उदाहरणं आजही चपखलपणे लागू पडतात. चाणक्यनीती म्हणजे आर्य चाणक्यांनी माणसाला रोजच्या जगण्यात व्यवहारकुशल होण्यासाठी केलेलं मार्गदर्शन आहे. तथापि, ‘चाणक्यनीती’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही. त्यांनी आपल्या सगळ्या लेखनातून व्यवहारज्ञानाबद्दल मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलेली ती सगळी तत्त्वं आज चाणक्यनीती या नावाने ओळखली जातात.

Best Of Chanakya Niti –

जे पती-पत्नी दररोज करतात हे काम, ते लवकर म्हातारे होतात

अशा 5 गोष्टी ज्या नवरा-बायकोनं रात्री झोपण्याआधी जरूर कराव्यात

पुरुषांवर नजर पडताच सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला

बायकोसोबत ‘हे’ केल्यास आगीशिवायच ‘जळतो’ नवरा

‘कौटिलीय अर्थशास्त्र’ नावाच्या ग्रंथाचं लेखन हे आर्य चाणक्य यांचं मोठं आणि महत्त्वाचं काम; पण हे अर्थशास्त्र केवळ ‘इकॉनॉमिक्स’ या विषयापुरतं मर्यादित नाही. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. ‘इकॉनॉमिक्स’ हा त्यातला फक्त एक भाग आहे. चाणक्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, वित्त व्यवस्थापन, करव्यवस्था, दंडनीती, गुप्तहेर नेमणूक, मंत्री व अमात्यांची निवड, शत्रूंचा समाचार, भ्रष्टाचार नियंत्रण, विविध खात्यांची व्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, युद्धनीती, जवळच्या राष्ट्रांशी संबंध यांसह व्यवहारकुशलतेच्या विषयांचा समावेश होतो. अर्थशास्त्राबद्दलच्या त्या काळात उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा आधारही त्यांनी आपला ग्रंथ तयार करताना घेतला. त्यांचे संदर्भही त्या ग्रंथात दिले आहेत; मात्र त्यांपैकी एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा संदर्भग्रंथ देश-परदेशात दोन हजार वर्षांहूनही अधिक काळ अभ्यासला जात आहे.

इ. स. पूर्व 350च्या सुमारास आर्य चाणक्यांचा जन्म झाला. तक्षशिला विद्यापीठात ते अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवत असत. विष्णुगुप्त हे आर्य चाणक्य यांचं मूळ नाव. जुलमी नंद राजाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे शेंडीला गाठ मारून त्या घराण्याचा नाश करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती, अशी गोष्ट सांगितली जाते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्य राजाला राजव्यवहारासाठी आवश्यक त्या सर्व विषयांत पारंगत केलं आणि सम्राट बनवलं. त्या चंद्रगुप्त मौर्याने नंतर नंद घराण्याचा नाश केला.

कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथात सहा हजार श्लोक आहेत. त्यात प्रत्येक विषयाचं बारकाईने विवेचन केलेलं आहे. 1905 ते 1909 च्या दरम्यान म्हैसूरच्या श्यामशास्त्री यांनी या ग्रंथाची संस्कृतमधली उपलब्ध प्रत पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक भाषांमध्ये या ग्रंथाचे अनुवाद झाले. ‘माणसाची उपजीविका म्हणजे अर्थ. माणसांची वस्ती असलेल्या भूमीचा म्हणजेच पृथ्वीचा लाभ आणि तिचं पालन, याबाबतचे उपाय सांगणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र,’ असं या ग्रंथाच्या पंधराव्या प्रकरणात म्हटलं आहे. हा मूळ ग्रंथ काव्यरूप असून, नंतर तो गद्य स्वरूपात रूपांतरित झाला.

राजपुत्र भविष्यात उत्तम राजा होण्यासाठी त्याने शिक्षण कसं घ्यावं, वयाच्या कोणत्या वर्षी काय शिकावं, दिवसाच्या कोणत्या वेळात काय शिकावं अशा अत्यंत बारीकसारीक गोष्टींचं ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या ग्रंथात मार्गदर्शन केलं आहे. कररचना, शेतसारा, व्यापारी धोरणं, वजनमापं, विविध विभागांचे अध्यक्ष आणि त्यांचं कार्य, न्यायव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांना शिक्षा, दुष्काळ-रोगराई, युद्धासारख्या संकटांना सामोरं कसं जायचं, वगैरे विषयांची माहितीही या ग्रंथात आहे.

अजून दाखवा …